शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातून आजपासून हैदराबादमार्गे तिरुपती विमानसेवा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 12:49 IST

कोल्हापूर : प्रवाशांची संख्या अपुरी असल्याचे कारण देत इंडिगो कंपनीने कोल्हापूर - तिरुपती ही विमानसेवा शुक्रवारपासून बंद केली आहे. ...

कोल्हापूर : प्रवाशांची संख्या अपुरी असल्याचे कारण देत इंडिगो कंपनीने कोल्हापूर- तिरुपती ही विमानसेवा शुक्रवारपासून बंद केली आहे. मात्र, विमान प्राधिकरण व प्रवाशांनी या सेवेबाबत आग्रह धरल्याने कंपनीने कोल्हापूर- हैदराबाद ही विमानसेवा तिरुपतीपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा आज शनिवारपासून सुरू होणार आहे.कोल्हापुरातून तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोल्हापूर- तिरुपती ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेला प्रतिसादही चांगला मिळत होता. मात्र, कंपनीने प्रवाशांची संख्या कमी असल्याचे सांगत ही सेवा १५ डिसेंबरपासून बंद करण्यात येणार असल्याचे विमानतळ प्रशासनाला कळविले होते.यावर विमान प्राधिकरणाने त्यांना हैदराबादमार्गे तिरुपती सेवा सुरू ठेवण्याची विनंती केली. इंडिगो कंपनीने ही मागणी मान्य केली असून आज शनिवारपासून कोल्हापूर- हैदराबाद- तिरुपती अशी विमानसेवा आज सुरू होणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरण संचालक अनिल शिंदे यांनी दिली. ७५ प्रवासी क्षमता असणारे हे विमान आता हैदराबादमध्ये थांबा घेऊन तिरुपतीला रवाना होईल.

  • कोल्हापुरातून प्रस्थान : दुपारी १:३५ वाजता
  • तिरुपतीला पोहाेचणार : ४:५० वाजता
  • प्रवासी क्षमता : ७५
टॅग्स :kolhapurकोल्हापूरairplaneविमानtirupati-pcतिरुपती