शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

कोल्हापूर : कलामहाविद्यालयातील १२० जागांसाठी तीनशे अर्ज, फौंडेशन, उपयोजित कलेकडे ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 18:00 IST

कला क्षेत्रातील करिअरच्या नवनवीन संधीमुळे एकेकाळी दुर्लक्षित असलेल्या कलामहाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अक्षरश: झुबंड उडाली आहे. फौंडेशन आणि उपयोजित कला या दोन वर्गांतील प्रत्येकी ३० क्षमतेच्या विद्यार्थी वर्गांसाठी शंभरहून अधिक अर्ज आले आहेत.

ठळक मुद्देकलामहाविद्यालयातील १२० जागांसाठी तीनशे अर्जविद्यार्थ्यांचा फौंडेशन, उपयोजित कलेकडे ओढा

कोल्हापूर : कला क्षेत्रातील करिअरच्या नवनवीन संधीमुळे एकेकाळी दुर्लक्षित असलेल्या कलामहाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अक्षरश: झुबंड उडाली आहे. फौंडेशन आणि उपयोजित कला या दोन वर्गांतील प्रत्येकी ३० क्षमतेच्या विद्यार्थी वर्गांसाठी शंभरहून अधिक अर्ज आले आहेत.काही वर्षांपूर्वीपर्यंत चित्रकला या विषयाकडे केवळ छंद या दृष्टीने पाहिले जायचे. त्यामुळे करिअर म्हणून हे क्षेत्र नेहमीच दुर्लक्षित राहिले; मात्र गेल्या पाच सहा वर्षात जाहिरात, अ‍ॅनिमेशन, डिझायनिंग, वेब मिडिया, वर्तमानपत्रे, प्रिटींग प्रेस, फॅशन डिझायनिंग, इंटिरिअर डेकोरेशन, डिजीटायझेशन, मालिका, चित्रपट या क्षेत्रांची झपाट्याने वाढ झाल्याने कलेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील दळवीज आर्टस इन्स्टिट्युट, रा. शी. गोसावी कलानिकेतन आणि कलामंदिर या तीनही कलामहाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे.या तीनही कलामहाविद्यालयांमध्ये फौंडेशन या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रवेश मर्यादा ३० इतकी आहे. त्यासाठी शंभरहून अधिक अर्ज आले आहेत. उपयोजित कला (कमर्शियल आर्ट) हा अभ्यासक्रम केवळ कलानिकेतन महाविद्यालयात शिकवला जातो.

या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा फार मोठा ओढा असून त्यातील ३० जागांसाठी शंभरच्या आसपास अर्ज आले आहेत. याशिवाय इलिमेंटरी, इंटरमिजीएट, अ‍ॅडव्हान्स आणि डिप्लोमा या वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा कोरम पूर्ण भरला आहे. क ला शिक्षक या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी असल्याने प्रवेशक्षमतेपेक्षा कमी विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत अशी माहिती कलानिकेतनचे प्रा. मनोज दरेकर यांनी दिली.

कॅम्पसमधून नोकरीच्या संधीकाही दिवसांपूर्वीच दळवीज आर्टस इन्स्टिट्युटमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आल्या. त्यामध्ये महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांची निवड होऊन मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये मोठ्या वार्षिकपॅकेजसह हे विद्यार्थी नोकरीच्या ठिकाणी रुजू झाले आहे. मुख्यत्वे अ‍ॅनिमेटर आर्टीस्ट, डिझायनर म्हणून या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळतात, अशी माहिती प्राचार्य अजेय दळवी यांनी दिली. 

 

टॅग्स :artकलाkolhapurकोल्हापूरeducationशैक्षणिक