शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

कोल्हापूर : साडेतीन लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 14:04 IST

‘थर्टी फर्स्ट’च्या तयारीसाठी शासनाचा महसूल बुडवून चोरून आणलेला साडेतीन लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने करवीर तालुक्यात तीन ठिकाणी छापे टाकून पकडला.

ठळक मुद्देसाडेतीन लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्तकार जप्त : करवीर तालुक्यांतील तिघांना अटक

कोल्हापूर : ‘थर्टी फर्स्ट’च्या तयारीसाठी शासनाचा महसूल बुडवून चोरून आणलेला साडेतीन लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने करवीर तालुक्यात तीन ठिकाणी छापे टाकून पकडला.

या प्रकरणी संशयित स्वप्नील तानाजी कानकेकर (वय २६, रा. बापूरामनगर, कळंबा, ता. करवीर), ज्योतीराम महादेव पाटील (३५, रा. कोगे, ता. करवीर), गणी नबीसो मुल्लाणी (३२, रा. शिरोली दुमाला, पोस्ट गल्ली, ता. करवीर) अशी मद्यतस्करांची नावे आहेत.

जप्त केलेल्या बनावट विदेशी मद्याची निर्मिती कोठे करण्यात आली; यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे गोवा-कर्नाटक राज्यांत असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.अधिक माहिती अशी, दरवर्षी ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर गोव्याहून महाराष्ट्र-कर्नाटकात बेकायदेशीररीत्या विदेशी मद्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. करवीर तालुक्यातील काही गावांतील मद्यतस्करांनी गोव्याहून मद्यसाठा आणून ठेवला होता.

‘थर्टी फर्स्ट’ला त्याची ते विक्री करणार होते. या प्रकाराची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपविभागीय आयुक्त वाय. एम. पवार व अधीक्षक गणेश पाटील यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली. त्यांनी निरीक्षक संभाजी बरगे व पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे सापळा रचला असता गगनबावड्याहून कोल्हापूरच्या दिशेने एक संशयित कार (एमएच ०२ बीपी २७४६) आली.

पोलिसांनी पाठलाग करून तिला थांबविले. त्यात संशयित स्वप्नील कानकेकर हा आढळून आला. कारमध्ये पाठीमागे ठेवलेले खाकी पुठ्ठ्याचे बॉक्स आढळून आले. ते उघडून पाहिले असता विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या.मद्याच्या बाटल्यांची तपासणी केली असता यामध्ये विविध ब्रँडच्या व वेगवेगळ्या बॅच क्रमांक असलेल्या बाटल्या दिसून आल्याने संशय वाढला. सखोल चौकशी केली असता रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावटरीत्या तयार केलेले मद्य पुनर्भरण करून बुचे लावून नियमित किमतीपेक्षा कमी दराने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असल्याची कबुली संशयित कानकेकर याने दिली.

हे मद्य कोठून आणले अशी विचारणा केली असता त्याने ते कोगे येथून आणल्याचे सांगितले. त्यानुसार ज्योतीराम पाटील (कोगे) व गणी मुल्लाणी (शिरोली दुमाला) या दोघांच्या घरी एकाच वेळी छापा टाकून बनावट विदेशी मद्य जप्त केले.वाहनांची कसून तपासणीगोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवरून विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. गोव्यामध्ये दारूचे दर कमी असल्याने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील पंटर मद्यसाठा इकडे आणण्याचा बेतात आहेत. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाकडून वाहनांची, विशेषत: प्रवासी एस. टी. बस, ट्रॅव्हल्स गाड्या व खासगी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

 

‘थर्टी फर्स्ट’साठी अशा प्रकारचे कमी किमतीत मिळणारे मद्य खरेदी करू नये. हे मद्य शरीरास अपायकारक असून, यामधून व्यक्ती दगावण्याची शक्यता आहे. आणखी कुठे अशा प्रकारे मद्यसाठा आहे काय, याची सखोल चौकशी पथकाकडून सुरू आहे.गणेश पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर

 

 

 

टॅग्स :liquor banदारूबंदीkolhapurकोल्हापूर