शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कॅन्सर रुग्णालय सव्वा कोटींच्या अपहार प्रकरणाची कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 18:52 IST

गोकुळ शिरगांव येथील कोल्हापूर कॅन्सर रुग्णालयातील अकौंट व्यवस्थापकाने औषध खरेदीच्या बोगस बिलाच्या नोंदी करून सुमारे १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देकॅन्सर रुग्णालय सव्वा कोटींच्या अपहार प्रकरणाची कसून चौकशी, संशयित पसार

कोल्हापूर : गोकुळ शिरगांव येथील कोल्हापूर कॅन्सर रुग्णालयातील अकौंट व्यवस्थापकाने औषध खरेदीच्या बोगस बिलाच्या नोंदी करून सुमारे १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रुग्णालयास बुधवारी भेट देऊन दिवसभर कसून चौकशी केली. कागदोपत्री भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संशयित अकौंट व्यवस्थापक अजय आनंदराव खोत (रा. लाईन बाजार, कसबा बावडा), किरण शिंदे (रा. कोडोली, ता. पन्हाळा), प्रवीण दत्तात्रय आळतेकर (रा. माळवाडी, दानोळी, ता. शिरोळ) हे पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.डॉ. सूरज भास्करराव पवार (वय ४८, रा. माळी कॉलनी, टाकाळा) यांच्या मालकीचे गोकुळ शिरगांव येथे कोल्हापूर कॅन्सर रुग्णालय आहे. याठिकाणी संशयित अजय खोत हा अकौंट व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने दि. २ जानेवारी २०१५ ते १ एप्रिल २०१६ या कालावधीत आपल्या पदाचा गैरवापर करत औषध खरेदीच्या बोगस बिलांच्या नोंदी करून संशयित किरण शिंदे व प्रवीण आळतेकर यांच्याशी संगनमत करून औषध पुरवठ्याची खोटी बिले सादर करून सव्वा कोटींचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्यासह चौघांच्या पथकाने रुग्णालयास भेट देऊन येथील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले. संशयितांच्या घराची झडती घेतली असता ते पसार झाल्याचे निदर्शनास आले.

त्यांचे मोबाईलही बंद आहेत. कागदोपत्री चौकशी सुरू असून भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच संशयितांना अटक केली जाईल, असे शेडे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर