शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जयंती नदीमध्ये प्राणवायूच नाही, तपासणीचा निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 16:46 IST

जयंती नदीतील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची जागेवरच तपासणी करण्यात आली. त्यातील निष्कर्षानुसार या पाण्यामध्ये मासे किंवा इतर जलचरांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक प्राणवायूच नसल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देजयंती नदीमध्ये प्राणवायूच नाही, तपासणीचा निष्कर्ष‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस’च्या वतीने तज्ज्ञांकडून पाहणी

कोल्हापूर : असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्सच्या वतीने तज्ज्ञांसोबत जयंती नदी (नाला) आणि गोमती नदीची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये जयंती नदीतील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची जागेवरच तपासणी करण्यात आली. या पाण्यातील प्राणवायूची मात्रा तपासण्यात आली. त्यातील निष्कर्षानुसार या पाण्यामध्ये मासे किंवा इतर जलचरांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक प्राणवायूच नसल्याचे स्पष्ट झाले.पुणे येथील पर्यावरणतज्ज्ञ विनोद बोधनकर, जयप्रकाश पराडकर, नीलेश इनामदार, ओमकार गानू यांनी पाण्याची तपासणी केली. हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिर परिसरातील जयंती नदीचा अभ्यास सकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये करण्यात आला.या वेळी झालेल्या पाहणीच्या निष्कर्षांनंतर पर्यावरणतज्ज्ञ विनोद बोधनकर यांनी सांगितले की, या नाल्यातील पाण्यामध्ये प्राणवायूच शिल्लक नसल्यामुळे कोणतेही जलचर प्राणी जगू शकत नाहीत. या भागातील लोकांकडून प्रदूषणाचे हे घटक पाण्यापर्यंत जाऊ नयेत यासाठी लोकजागृती करणे आवश्यक आहे.

दरम्यान, या पाहणीपूर्वी असोसिएशनच्या कार्यालयामध्ये ‘घनकचरा निर्मूलन व्यवस्थापन’ या विषयावर वरील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये पर्यावरणतज्ज्ञ बोधनकर यांनी घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. त्यांनी ‘सागर मित्र’ संघटनेची माहिती दिली.

अभ्यासक जयप्रकाश पराडकर यांनी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाबद्दल मार्गदर्शन केले. नीलेश इनामदार यांनी ‘घनकचऱ्यापासून इंधननिर्मिती’विषयी माहिती सांगितली.

यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय चोपदार, सेक्रेटरी राज डोंगळे, माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत, अनिल घाटगे, उमेश कुंभार, प्रशांत काटे, प्रमोद पोवार, विजय आर. पाटील, निशांत पाटील, सचिन घाटगे, अतुल दिघे, विनायक दिवाण, सुभाष यादव, आदी उपस्थित होते.

पंचगंगा प्रदूषणमुक्तीचे कामपंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आमच्या असोसिएशनचे काम सुरू आहे.लोकसहभागाकरिता जनजागृतीला आम्ही प्राधान्य देणार आहोत. माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून यापूर्वी केलेल्या जयंती नदीच्या सर्व्हेक्षणाची माहिती दिली.

 

 

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूर