शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : वन अधिकाऱ्याच्या घरात अडीच लाखाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 15:41 IST

न्यु पॅलेस रोड पाटोळे मळा येथील वनअधिकारी यांच्या भाड्याच्या घराचा कडीकोयंडा उचकटून नऊ तोळे सोने व चांदीचे दागिने, ४० हजार रुपये असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला.

ठळक मुद्दे वन अधिकाऱ्याच्या घरात अडीच लाखाची चोरीनऊ तोळ्यांसह ४० हजारच्या रकमेवर डल्ला : पाटोळे मळ्यातील घटना

कोल्हापूर : न्यु पॅलेस रोड पाटोळे मळा येथील वनअधिकारी यांच्या भाड्याच्या घराचा कडीकोयंडा उचकटून नऊ तोळे सोने व चांदीचे दागिने, ४० हजार रुपये असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि. २३) दूपारी उघडकीस आली.याबाबत विजय राजाराम खेडकर (वय ३८, रा. पाटोळे मळा, प्लॉट नंब र ८४/१) यांनी शाहूपुरी पोलिसात दिली.पोलिसांनी सांगितले की, विजय खेडकर हे वन्यजीव, कोल्हापूर येथे विभागीय वनअधिकारी आहेत. ते पत्नी कांचन, मुलगा सोहम व मुलगी मृणाल असे एकत्रित घरमालक अतुल अनिल पाटोळे यांच्या घरात एका वर्षापासून ते राहतात. गुरुवारी कांचन खेडकर या न्यु पॅलेस येथे मुलानां शाळेतून आणण्याकरिता घराला कुलूप लावून गेल्या होत्या. त्या शाळेतून घरी आल्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजाचा कडीकोयंडा उचकटल्याचे त्यांना निदर्शनास आले.

त्या खोलीमध्ये आत गेल्या. त्याठिकाणी लोखंडी तिजोरीचे लॉकरचे लॉक तिथेच असलेल्या चावीने उघडलेले तसेच तिजोरीतील बँकेचे चेकबुक, पासबुक व इतर साहित्य विस्कटल्याचे दिसले. हा प्रकार त्यांनी पती विजय खेडकर यांना सांगितला. याबाबतचा प्रकार खेडकर यांनी पोलिसांना कळविला. त्यानूसार पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.चार तोळ्याचे सोन्याचे एक गंठण, दोन तोळ्याचे सोन्याचे एक गंठण, एक तोळ्याचे कानातील टॉप्स, सोन्याची चेन, अर्ध्या तोळ्याची चेन, तीन चांदीचे कॉईन, चांदीची तीन पैंजणे व ४० हजार रुपये असा सुमारे दोन लाख ५२ हजार रुपयांचा माल चोरट्याने नेला. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर