शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : हेरले येथे चोरी, दुचाकीसह रोख रक्कम, सोन्याच्या दागिन्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 12:13 IST

 हेरले ( ता. हातकणंगले) येथील माळभाग चर्चच्या पाठिमागे वास्तव्य करणाऱ्या बबन भाऊ कदम यांच्या घरात सोमवार मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी दोन दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पंधरा हजार रुपये लंपास केले. 

ठळक मुद्देहेरले येथे चोरी, घरातील फोडली तिजोरीदुचाकीसह रोख रक्कम, सोन्याच्या दागिन्यांचा समावेश

कोल्हापूर : हेरले ( ता. हातकणंगले) येथील माळभाग चर्चच्या पाठिमागे वास्तव्य करणाऱ्या बबन भाऊ कदम यांच्या घरात सोमवार मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी दोन दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पंधरा हजार रुपये लंपास केले. 

घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बबन भाऊ कदम हे सेवानिवृत्त कर्मचारी शेती करतात. ते पत्नी, मुलगा रोहितसह  माळ भाग चर्चच्या पाठिमागे वास्तव्य करतात. सोमवारी रात्री तिजोरी जवळ दोघे  झोपी गेले. मुलगा वरच्या मजल्यावर खोलीमध्ये झोपला.

दोनच्या सुमारास चोरांनी प्रथमतः गेटचे कुलूप तोडून मोळा बांधलेल्या काठीच्या साह्याने खिडकीतून घरात प्रवेश केला. मुख्य दरवाज्याची कढी काढून  चोरांनी तिजोरी उघडून दहातोळे सोन्याचे दागिने, पंधरा हजार रुपये रोकड व दुचाकी (क्र MH-09AR-6973), (क्र MH-09CF4065) चोरून पोबारा केला.

घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. चोरांनी घरातील दहयाचा डबा व छोटी पाण्याची घागर घेऊन घरापासून अंदाजे शंभर मिटरवर दहयाचा आस्वाद घेत पर्स व इतर साहित्याची तपासणी करून त्या वस्तू तिथेच टाकून निघून गेले.पहाटे शेजाऱ्याना कदम यांच्या घराचे गेट व दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कदम यांना फोन लावला, ते जागे झाले, त्यानंतर त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे कळले. बबन कदम यांनी तात्काळ हातकणंगले पोलीस ठाण्यास चोरीची वर्दी दिली. सकाळी घटना स्थळावर दाखल झालेल्या हातकणंगले पोलींसानी घराचा पंचनामा केला.

पोलींसानी चोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केले होते. घरापासून दोन तीनशे मिटरपर्यंत माग काढून कोल्हापूर-सांगली मार्गापर्यंत  श्वान घुटमळ्ले. मध्यवस्तीत धाडसी चोरीच्या प्रकाराने गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेरले गावात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून त्याच बरोबर घरात धाडसी चोरीचा प्रकार घडल्याने चोरटयांना जेरबंद करण्याचे आव्हान हातकणंगले पोलींसासमोर उभे आहे. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीसात झाली असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर