शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कऱ्हाडच्या विमा अधिकाऱ्याचे पाकीट लंपास, पन्नास हजार रुपये रोकड लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 16:46 IST

कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे कऱ्हाडच्या बसमध्ये चढताना विमा अधिकाऱ्याचे पैशाचे पाकीट चोरट्याने हातोहात लंपास केले.

ठळक मुद्देकऱ्हाडच्या विमा अधिकाऱ्याचे पाकीट लंपास पन्नास हजार रुपये रोकड लांबवली

कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे कऱ्हाडच्या बसमध्ये चढताना विमा अधिकाऱ्याचे पैशाचे पाकीट चोरट्याने हातोहात लंपास केले.पाकिटामधील २५ हजार ५०० रुपये व दोन एटीएम कार्डांवरून २५ हजार रुपये काढून सुमारे ५० हजार ५०० रुपये चोरट्याने लांबविले. रविवारी (दि. ३) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.अधिक माहिती अशी, धैर्यशील गजानन पाटील (वय ३४, रा. बनपुरीकर कॉलनी, कऱ्हाड , जि. सातारा, मूळ सोनखिरे, ता. कडेगाव, जि. सांगली) हे कऱ्हाडमध्ये विमा कंपनीत अधिकारी आहेत. रविवारी ते कोल्हापुरात फर्निचरच्या कामासाठी आले होते. काम आवरून सायंकाळी सहाच्या सुमारास कऱ्हाडला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक येथे आले.

बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या पॅँटच्या पाठीमागील खिशातील पाकीट चोरले. बसमध्ये चढल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी पाकीट आजूबाजूला कुठे पडले आहे का, याचा शोध घेतला असता ते सापडले नाही. पाकिटामध्ये २५ हजार ५०० रुपये होते.

एटीएम कार्ड, पॅनकार्ड होते. एटीएम कार्डच्या पाकिटावर पासवर्ड (पिन) असल्याने चोरट्याने बॅँक आॅफ महाराष्ट्र शाखेच्या एटीएममधून २० हजार आणि भारती सहकारी बँकेमधून पाच हजार असे २५ हजार रुपये काढले. त्याचा संदेश पाटील यांच्या मोबाईलवर आला.

पाकीट चोरीला गेल्याची खात्री होताच त्यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्याचा चेहरा निष्पन्न केला आहे. चोरटा हा सराईत असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा