'तिनं' २८ वेळा OTP सांगितलं, 'त्यानं' सात लाखांना गंडा घातला! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 02:40 PM2018-06-04T14:40:57+5:302018-06-04T14:40:57+5:30

एटीएम कार्डवरील 16 अंकांची माहिती सांगा. मोबाइलवर आलेला ओटीपी द्या....

Navi Mumbai: Woman swindled out of Rs 7 lakh after sharing her OTP 28 times over one week | 'तिनं' २८ वेळा OTP सांगितलं, 'त्यानं' सात लाखांना गंडा घातला! 

'तिनं' २८ वेळा OTP सांगितलं, 'त्यानं' सात लाखांना गंडा घातला! 

Next

मुंबई - नेरुळ येथील 40 वर्षीय महिलेला एका व्यक्तीने सात लाखांचा गंडा घातला आहे. महिलेला स्वता:च्या चुकीमुळे हा फटका बसला आहे. आठवड्यामध्ये डेबिट कार्डचा ओटीपी तिने 28 वेळा त्या ठगाला सांगितला. राष्ट्रीयकृत बँकेतून बोलतोय, तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपलीय. तुमचं कार्ड ब्लॉक करण्यात आलंय. एटीएम कार्डवरील 16 अंकांची माहिती सांगा. मोबाइलवर आलेला ओटीपी द्या. असा फोन नवी मुंबईतील 40 वर्षीय महिलेला आला होता. तस्नीम मुज्जकर मोडक असे त्या महिलेचे नाव आहे. याबबात मोडक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी तस्नीम मुज्जकर मोडक यांना एक कॉल आला होता. राष्ट्रीय बँकेतून बोलत आहे, टेक्निकल कारणामुळं तुमचे कार्ड ब्लॉक होणार आहे. तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी  सांगा. कार्ड ब्लॉकवर तोडगा काढला जाईल असे त्या ठगाने सांगितले. 

तस्नीम मुज्जकर मोडक यांनी त्या ठगाला  एटीएम कार्डवरील 16 अंकांची माहिती, नाव आणि तीन आकडी सीवीवी पिनही सांगितल्याची माहिती क्राईम ब्रांच पोलिस आधिकारी बीएन आउती यांनी दिली. तस्नीम मुज्जकर मोडकने एकवेळा नाहीतर ही माहिती 28 वेळा दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई, नोयडा, गुरुग्राम, कोलकाता आणि बंगळुरुमधून कार्डचे व्यवहार झाले आहेत. 

(आणखी वाचा : बँकेतून फोन आलाय?... सावधान; जाळ्यात अडकू नका! अशी घ्या काळजी)

Web Title: Navi Mumbai: Woman swindled out of Rs 7 lakh after sharing her OTP 28 times over one week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.