शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :पन्हाळा तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 10:43 IST

साखर आयुक्तांनी आदेश देऊनही पन्हाळा तहसीलदारांनी वारणा साखर कारखान्यावर साखरजप्तीची कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे करण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापूर :पन्हाळा तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करा‘अंकुश’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ‘वारणा’ थकीत एफआरपी प्रकरण

कोल्हापूर : साखर आयुक्तांनी आदेश देऊनही पन्हाळा तहसीलदारांनी वारणा साखर कारखान्यावर साखरजप्तीची कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे करण्यात आली.‘वारणा’ कारखान्याने २०१७-१८ या हंगामातील ‘एफआरपी’प्रमाणे ११५ कोटी ९२ लाख १२ हजार रुपये देणे आहे. शेतकऱ्यांना चौदा दिवसांत उसाचे ‘एफआरपी’प्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे. तसा कायदा असताना ‘वारणा’ प्रशासन त्याची पायमल्ली करीत आहे.

याबाबत साखर आयुक्तांकडे पाठपुरावा केल्यानंतर आयुक्तांनी आर. आर. सी.ची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आपण पन्हाळा तहसीलदारांना १६ एप्रिल रोजी कार्यवाही करण्याचे आदेश दिले; पण गेल्या अडीच महिन्यांत तहसीलदारांनी काहीच कारवाई न केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.जूनअखेर शेतकऱ्यांना पीककर्जाची परतफेड करावी लागते. वेळेत पीककर्जाची परतफेड केली तरच त्यांना सरकारच्या व्याज सवलतीचा फायदा होतो. इतर कारखान्यांनी कारवाईच्या धसक्याने पैसे दिले. ‘वारणा’ कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ११५ कोटी रुपये अडकून पडले आहेत.

कायद्याप्रमाणे ही रक्कम १५ टक्के व्याजासह १५ जुलैपर्यंत वसूल करून द्यावी. त्याचबरोबर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पन्हाळा तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू, असा इशाराही ‘अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी दिला.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले. यावेळी धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, अक्षय पाटील, अविनाश पाटील, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरTahasildarतहसीलदार