शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कारागृह सुरक्षारक्षक निलंबित, प्रशिक्षणार्थी पाच सुरक्षारक्षक सेवेतून होणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:48 IST

वाई हत्याकांडातील संशयित नराधम संतोष गुलाबराव पोळ (रा. धोम, ता. वाई) याला कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल पुरविल्याप्रकरणी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी शुक्रवारी सुरक्षारक्षकास तडकाफडकी निलंबित केले.

ठळक मुद्देकारागृह सुरक्षारक्षक निलंबित, प्रशिक्षणार्थी पाच सुरक्षारक्षक सेवेतून होणार कमीकारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची माहिती

कोल्हापूर : वाई हत्याकांडातील संशयित नराधम संतोष गुलाबराव पोळ (रा. धोम, ता. वाई) याला कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल पुरविल्याप्रकरणी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी शुक्रवारी सुरक्षारक्षकास तडकाफडकी निलंबित केले.

राकेश शिवाजी पवार (वय ३०, रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. पोळ आणि अमोल पवार यांना छुप्या मार्गाने मदत केल्याचा ठपका पवार याच्यावर ठेवला आहे. तो दीड वर्षापूर्वी सोलापूरहून कळंबा कारागृहात रुजू झाला होता. त्याचे वर्तन सुरुवातीपासून संशयास्पद होते.

या प्रकरणात आणखी पाच प्रशिक्षणार्थी सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. त्यांना लवकरच सेवेतून कमी केले जाणार आहे. राज्याचे अप्पर कारागृह महासंचालक राजवर्धन यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती उपमहानिरीक्षक साठे यांनी दिली.दोन दिवसांपूर्वी मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन बंदी संतोष पोळ याच्याकडे पिस्तूल असल्याचा व्हिडीओ व्हॉट्स अ‍ॅपवरून प्रसारित झाला. उपमहानिरीक्षक साठे यांनी पोळकडे केलेल्या चौकशीत पिस्तूल बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे कारागृहात मोबाईल आला कोठून यासंबंधी कसून चौकशी केली असता, सोलापूरहून दीड वर्षापूर्वी बदली होऊन आलेला सुरक्षारक्षक राकेश पवार याचे नाव पुढे आले.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसर