शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  सूरज गुरव यांना निलंबित करा; अन्यथा जिल्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 14:46 IST

राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांचा इशारा; अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन कोल्हापूर : करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी महापौर निवडणुकीवेळी राष्ट्र वादी-काँग्रेस नगरसेवकांना ...

ठळक मुद्देसूरज गुरव यांना निलंबित करा; अन्यथा जिल्हा बंददोन नंबरवाल्यांशी संबंध

राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांचा इशारा; अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदनकोल्हापूर : करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी महापौर निवडणुकीवेळी राष्ट्र वादी-काँग्रेस नगरसेवकांना सभागृहात न सोडण्याची सुपारी घेतल्याचा आरोप राष्ट्र वादी-काँग्रेसच्या नेत्यांनी केला.

आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाची चौकशी करून त्यांच्यावर चार दिवसांत निलंबनाची कारवाई न केल्यास कोल्हापूर जिल्हा बंद करण्याचा इशाराही यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांना निवेदनाद्वारे दिला. ‘मी निवेदन स्वीकारले आहे. त्या संदर्भात लवकरात लवकर चौकशी करू,’ इतकेच उत्तर काकडे यांनी दिले.सोमवारी (दि. १०) महापौर-उपमहापौर निवडीवेळी पोलीस उपअधीक्षक गुरव यांनी आमदार मुश्रीफ यांच्याशी वादावादी केली. त्या पार्श्वभूमीवर महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक काकडे यांची भेट घेतली.प्रा. जयंत पाटील म्हणाले, ‘कोणाच्या तरी दबावाखाली पोलिसांनी दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांना वेळेत सभागृहात न सोडण्याचे षड्यंत्रच रचले होते; त्यासाठी उपअधीक्षक गुरव यांनी सुपारी घेतली असावी. आमदार मुश्रीफ यांच्याशी त्यांनी ज्या स्टाईलने वाद घातला, त्यावरून त्यांनी मद्यप्राशन केले असावे, अशी शंका येते.’यावेळी माजी उपमहापौर महेश सावंत, नगरसेवक शारंगधर देशमुख, डॉ. संदीप नेजदार, राहुल माने, संजय मोहिते, नियाज खान, जिल्हा परिषदेचे सदस्य भगवान पाटील, राजू लाटकर, आदिल फरास, उत्तम कोराणे, विनायक फाळके, विक्रम जरग, इंद्रजित बोंद्रे, प्रकाश गवंडी, भैया माने, गणी आजरेकर, आदी जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन नंबरवाल्यांशी संबंधउपअधीक्षक गुरव यांचे दोन नंबरवाल्यांशी साटेलोटे आहे. वारणा लूट प्रकरणासह त्यांच्या मालमत्तेबाबत चौकशी करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफ