शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांची स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 15:02 IST

सौते (ता. शाहूवाडी) येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष केशव ज्ञानदेव वारंग (वय ५५) यांनी बाराबोअर बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. सोमवारी (ता.३१) रात्री साडे आठच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. शाहूवाडी पोलिसांत सोमवारी रात्री उशिरा घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.

ठळक मुद्देतंटामुक्त समितीच्या अध्यक्षांची स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या घरासमोर सुरू होता लाऊडस्पीकर लावून थर्टी फर्स्टचा जल्लोष

मलकापूर/कोल्हापूर : सौते (ता. शाहूवाडी) येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष केशव ज्ञानदेव वारंग (वय ५५) यांनी बाराबोअर बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. सोमवारी (ता.३१) रात्री साडे आठच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. शाहूवाडी पोलिसांत सोमवारी रात्री उशिरा घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव ज्ञानदेव वारंग यांचे सौते (ता. शाहूवाडी) येथे राहते घर व किरकोळ किराणा विक्रीचे दुकान आहे. पत्नी, मुलगा भरत यांच्यासह ते येथे वास्तव्यास होते. तर त्यांच्या दोन मुलींचे विवाह झाले आहेत. केशव वारंग हे सोमवारी रात्री आठच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातील दुसऱ्या मजल्यावर गेले याचवेळी घरासमोरच्या चौकात गावातील तरुण मंडळी लाऊडस्पीकर लावून थर्टी फर्स्टचा जल्लोष साजरा करीत होते.

दरम्यान केशव वारंग यांनी बाराबोअर बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. परंतु घरासमोर चौकात सुरू असलेल्या जल्लोषामुळे कोणालाही या गोळीबाराचा आवाज ऐकू आला नाही. जेवणाच्या निमित्ताने रात्री नऊ वाजता भरत याने वडिलांना हाक मारली परंतु काहीच प्रतिसाद न मिळाल्याने भरत याने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता सदरची धक्कादायक घटना समोर आली.

यावेळी बंदुकीची गोळी छातीत झाडून घेऊन वडील केशव वारंग हे बेडवरच रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्याने मुलगा भरतसह त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेतली. परिसरातही घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. तर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे हेही सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी घटनास्थळावरील बंदूक ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. याचवेळी घरगुती करणातून केशव वारंग अनेक दिवसांपासून निराश होते, असा जबाब त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिला आहे.

मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळाल्यानंतर सौते येथे मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शाहूवाडी उपविभागाचे प्रभारी अधिकारी अनिल कदम यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रानमाळे हे अधिक तपास करीत आहेत.पायाच्या अंगठ्याने ओढला चाप..केशव वारंग यांना शिकारीचा मोठा छंद होता. त्यातून त्यांना बंदूक चालविण्याचे कसबही अवगत झाले होते. गोळी झाडून घेऊन आत्महत्या करताना बेडवर बसून त्यांनी या बंदुकीचा दस्ता पायात तर नळ्या हाताने स्वतःच्या छाताडावर धरून पायाच्या अंगठ्याने बंदुकीचा चाप ओढला असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर