शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : भोसलेवाडीत अवैध बांधकाम तोडताना पेटवून घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 18:31 IST

बांधकाम परवानगी व्यतिरिक्त सेटबॅक जागेत जादा केलेले बांधकाम पाडायला गेलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीव्र विरोध करीत एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे भोसलेवाडी परिसरात गुरुवारी एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्याने पुढील प्रसंग टळला. यामुळे मनपा अधिकाऱ्यांनी आपली कारवाई स्थगित ठेवली.

ठळक मुद्देअवैध बांधकाम तोडताना आत्महत्तेचा प्रयत्नभोसलेवाडीतील प्रकार पोलिसांमुळे टळली घटना

कोल्हापूर : बांधकाम परवानगी व्यतिरिक्त सेटबॅक जागेत जादा केलेले बांधकाम पाडायला गेलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीव्र विरोध करीत एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे भोसलेवाडी परिसरात गुरुवारी एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्याने पुढील प्रसंग टळला. यामुळे मनपा अधिकाऱ्यांनी आपली कारवाई स्थगित ठेवली.याबाबत मनपा अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती अशी की, भोसलेवाडी येथील अ‍ॅपल हॉस्पिटलजवळील (सि.स.नं. ६०८/२) मिळकतीमध्ये कुंडलिक कोटकर यांनी दोन मजली घर बांधले आहे. सेटबॅकसाठी सोडावयाच्या जागेत जिना व एक रूमचे बांधकाम केले आहे.

कोटकर यांनी जादा बांधकामाची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे शेजारील इमारतींना मिळणारा सुर्यप्रकाश रोखला गेला. याबाबत शेजारील मिळकतधारकांनी लोकशाहीदिनात आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा करून आयुक्तांनी सेटबॅकमध्ये येणारे अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. यानुसार गुरुवारी सकाळी नगररचना विभागाने सकाळी दहा वाजता कारवाई सुरू केली.त्यावेळी कोटकर यांनी महापालिकेच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिल्याचे सांगितले. स्थगितीबाबतची कागदपत्रे सादर करा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर महापालिका व त्यांच्या विधितज्ज्ञांशी बोलल्यानंतर स्थगिती आदेश नसल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू करताच कुंडलिक कोटकर यांच्या लहान मुलाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. घडल्या प्रकाराने पोलिसांसह यंत्रणेची मोठी धावपळ उडाली.

पोलिसांनी धावत जाऊन कोटकर यांना अडविले तसेच बाजूला केले. त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. परिणामी, कारवाई स्थगित करण्याचा निर्णय यंत्रणेने घेतला. यावेळी कनिष्ठ अभियंता पद्मल पाटील व सुरेश पाटील यांच्यासह नगररचना व ताराराणी विभागीय कार्यालयाचे कर्मचारी व पोलीस उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा