शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :उसाची बिले सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 14:28 IST

यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या उसाची बिले सोमवार (दि. ७) पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची तयारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुरू केली आहे. एफआरपीतील ८० टक्के रक्कम पहिली उचल म्हणून दिली जाणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिटन २२०० ते २४५० रुपये मिळणार आहेत.

ठळक मुद्देउसाची बिले सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरसाखर कारखानदारांची तयारी : ८० टक्केप्रमाणे प्रतिटन २२०० ते २४५० रुपये उचल शक्य

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या उसाची बिले सोमवार (दि. ७) पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची तयारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुरू केली आहे. एफआरपीतील ८० टक्के रक्कम पहिली उचल म्हणून दिली जाणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिटन २२०० ते २४५० रुपये मिळणार आहेत.ऊसदराच्या आंदोलनात एकरकमी एफआरपीवर तडजोड होऊन यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला; पण साखरेचे दर २९०० रुपयांपर्यंत आल्याने एकरकमी एफआरपी देणे जमणार नाही, असा कारखानदारांनी सूर आळवला. हंगाम सुरू होऊन दोन महिने होत आले, तरी एकरकमी एफआरपी, की दोन टप्प्यांत यावर चर्चा सुरू आहे.कारखानदार दोन टप्प्यांवर ठाम, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना एकरकमीच पाहिजे म्हणत असल्याने पेच निर्माण झाला आहे. ‘स्वाभिमानी’ने कारखानदारांना ३१ डिसेंबरची डेडलाईन दिली होती. या कालावधीतही शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने १ जानेवारीला प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. आता २५ जानेवारीपर्यंत एकरकमी एफआरपी देण्यास खासदार राजू शेट्टी यांनी मुदत दिली आहे.शेट्टी यांनी मुदत दिली असली, तरी साखरेचे दर पाहता, एकरकमी एफआरपी देणेच अशक्य असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे; त्यामुळे बॅँकांंकडून उपलब्ध होणारे पैसे पाहता एफआरपीमधील ८० टक्के रक्कम देण्याची तयारी कारखानदारांनी केली आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सरासरी २८०० रुपये एफआरपी होते; त्यामुळे ८० टक्के प्रमाणे प्रतिटन २२०० ते २४५० रुपयांपर्यंत पहिली उचल मिळणार आहे. सोमवारी (दि. ७) शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची तयारी कारखान्यांनी केली आहे.

बैठक होण्याची शक्यता धूसरउचलीबाबत शनिवारी (दि. ५) जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक होणार आहे; पण बैठक घेऊन उचल जाहीर करण्यापेक्षा थेट शेतकºयांच्या खात्यावरच पैसे वर्ग करावेत, असा प्रयत्न बहुतांशी कारखान्यांचा असल्याने बैठकीची शक्यता धूसर आहे. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर