शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी शिवाजी चौकात रिक्षाचालकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 12:09 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर शहर-जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी शिवाजी चौकात रिक्षांसह ठिय्या आंदोलन केले. त्यामध्ये भाजी विक्रेत्या महिला सहभागी झाल्या. त्यांनी सकल मराठा शौर्यपीठातर्फे सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला.

ठळक मुद्देमराठा आरक्षणासाठी शिवाजी चौकात रिक्षाचालकांचा ठिय्यासकल मराठा शौर्यपीठांवर पाठिंबा जाहीर; भाजी विक्रेत्या महिलांचा सहभाग

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर शहर-जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी शिवाजी चौकात रिक्षांसह ठिय्या आंदोलन केले. त्यामध्ये भाजी विक्रेत्या महिला सहभागी झाल्या. त्यांनी सकल मराठा शौर्यपीठातर्फे सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला. ठिय्या आंदोलनामुळे शिवाजी चौकातील वाहतूक ठप्प झाली.या चौकात दुपारी साडेबाराच्या सुमारास रिक्षाचालक आणि भाजी विक्रेत्या महिला दाखल झाल्या. त्यातील चालकांनी आपल्या रिक्षा शिवाजी चौक ते माळकर तिकटीपर्यंत रस्त्यावर लावल्या.

कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवाजी चौकात सकल मराठा शौर्यपीठातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात भाजी विक्रेत्या महिला सहभागी झाल्या. (छाया : नसीर अत्तार) 

भाजी विक्रेत्या महिलांनी शौर्यपीठावर ठिय्या मारला. त्यानंतर ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणांनी त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी प्रसाद जाधव, राजू जाधव, दीपा पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले.

या आंदोलनात उदय लाड, राहुल इंगवले, शिवाजीराव लोंढे, बाबासो देसाई, सुभाष पाटील, बंडा रकटे, शामराव भोजणे, अमोल पाटील, श्रीकांत वंदुरे, रंंजना खाडे, वंदना बुचडे, पार्वती शहा, हमिदा चौगुले, वैशाली पाटील, वंदना सताजी, उज्ज्वला पिसाळ, सावित्री पाटील, अक्काताई अवळे, मुमताज करंडे, सखूबाई शिंदे, राजश्री मोरे, वहिदा मुजावर, सलमा बागवान, मनीषा क्षीरसागर, आदींसह कसबा बावडा, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत-नेर्ली, शिवाजी चौक रिक्षा मित्रमंडळ, भवानी मंडप, वडगाव, गांधीनगर, जरगनगर, पाचगाव, कळंबा रिक्षा स्टॉपवरील चालक, शाहूपुरी, गांधीनगर, टिंबर मार्केट भाजी मंडईतील महिला भाजी विक्रेत्या सहभागी झाल्या.

दरम्यान,  आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी दि. २ सप्टेंबरला विविध तालीम संस्था, मंडळांची व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याचे प्रसाद जाधव यांनी सांगितले.

आरक्षणाची गरजया आंदोलनावेळी काही रिक्षाचालक, भाजी विक्रेत्या महिलांनी मनोगत व्यक्त केले. त्यात रिक्षाचालकांनी वाहनखरेदीसाठी बँकांकडून कर्ज घेताना आलेले अनुभव सांगितले. भाजी विक्रेत्यांनी आम्ही भोगलेली वाताहत आमच्या पुढील पिढीला भोगायला लागू नये, म्हणून मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याची भावना व्यक्त केली.

 

 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर