शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर  : मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह आदर्शवत करणार : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 18:40 IST

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात विकसित करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्याचे समाधान मिळाले. हे वसतिगृह आदर्शवत करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे सांगितले.

ठळक मुद्देमराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह आदर्शवत करणार : चंद्रकांत पाटीलवसतिगृहाची २६ जुलैला सुरुवात

कोल्हापूर  : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात विकसित करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्याचे समाधान मिळाले. हे वसतिगृह आदर्शवत करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे सांगितले.सदर बाजार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान इमारतीची दुरूस्ती करून वसतिगृहासाठी इमारत तयार केली आहे. मराठा समाजातील ७२ विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय या वसतिगृहामध्ये होणार आहे. त्या वसतिगृह इमारतीची पालकमंत्री पाटील यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. याठिकाणी दि. २६ जुलैपर्यंत मुले प्रत्यक्ष राहण्यास येतील, ते  म्हणाले.

या वसतिगृहाच्या पाहणीवेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, उद्योगपती चंद्रकांत जाधव, सुरेश पाटील, शशिकांत पाटील, अवधूत पाटील, शिरीष जाधव, आदी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी या नव्याने विकसित केलेल्या वसतिगृह इमारतीची माहिती दिली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले.

अण्णासाहेब पाटील महामंडळांतर्गत कर्जासाठीच्या अर्जदारांना बँका प्रतिसाद देत नाही. या बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिलीप पाटील यांनी यावेळी दिला.पालकमंत्री पाटील म्हणाले

  1. या वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे नावनोंदणी करावी.
  2. या वसतिगृहाच्या तळमजल्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विशेष केंद्र विकसित करणार
  3.  या परिसरातील दुरवस्था झालेल्या अन्य निवासस्थानांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करावा.

 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर