शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

कोल्हापूर : नव्या पुलाचेही स्ट्रक्चरल आॅडिट, शिवाजी पूल : शुक्रवारीही काम चालणार; वाहतूक बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 19:50 IST

ब्रिटीशकालीन शिवाजी पुलाचे आर्युमान संपल्याने या पुलासोबतच गुरुवारी नवीन पर्यायी पुलाचेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही शिवाजी पूल दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. हे काम शुक्रवारी दुपारपर्यंत चालण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तविली आहे. ध्रुव कन्सल्टन्सी प्रा. लि.च्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईच्या स्ट्रक्टवेल डिझायनर्स एजन्सीमार्फत हे काम सुरू आहे.

ठळक मुद्देनव्या पर्यायी पुलाचेही केले स्ट्रक्चरल आॅडिटशिवाजी पूल : शुक्रवारीही काम चालणार; वाहतूक बंदचइंडोस्कोपी मशीनद्वारे चाचणी

कोल्हापूर : ब्रिटीशकालीन शिवाजी पुलाचे आर्युमान संपल्याने या पुलासोबतच गुरुवारी नवीन पर्यायी पुलाचेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही शिवाजी पूल दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. हे काम शुक्रवारी दुपारपर्यंत चालण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तविली आहे. ध्रुव कन्सल्टन्सी प्रा. लि.च्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईच्या स्ट्रक्टवेल डिझायनर्स एजन्सीमार्फत हे काम सुरू आहे.गुरुवारीही दिवसभरात मेजर ब्रिज इन्स्पेक्शन युनिटला जोडलेल्या बकेटच्या साहाय्याने अभियंत्यांनी शिवाजी पुलाच्या खाली जाऊन पुलाची कमान, आर्च स्लॅब, दोन कॉलमचे अंतर यांचे टोटल स्टेशन युनिटच्या सहाय्याने मोजमाप केले.

या नवीन युनिटमुळे पुलाचे मोजमाप अचूकपणे मोजता आले. याशिवाय इंडोस्कोपी मशीनची वायर पुलाच्या दोन दगडामध्ये आत घुसवून पुलाच्या आतील परिस्थितीचा अंदाज घेतला. या अत्याधुनिक मशीनद्वारे पुलाच्या आतील बाजूस असणारे दगड निखळले असल्याच्या शक्यतेने ही चाचणी करण्यात आली.

ही इंडोस्कोपी मशीनद्वारे दिवसभर चाचणी सुरू होती. दुपारनंतर रडारसारख्या मशीनचा वापर करून जीपीआर टेस्ट (पुलाची भार क्षमता चाचणी) घेण्यात आली. त्यामुळे किती अवजड क्षमतेच्या वाहनांचा भार पूल पेलू शकतो याची माहिती घेण्यात आली.

दरम्यान, शिवाजी पुलाचे आर्युमान संपले असून या पुलाला १४० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शेजारी उभारलेल्या पर्यायी पुलाचेही काम वादात अडकल्याने हे काम गेली तीन वर्षे अर्धवट स्थितीत रेंगाळले आहे.

हा अर्धवट स्थितीत उभारलेल्या पर्यायी पुलाच्या बाजूला नदीतील पुराच्या पाण्याचा मारा मोठ्या प्रमाणावर असल्याने या अर्धवट स्थितीतील पुलाची क्षमताही या पथकाने तपासली. या पर्यायी पुलाचेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले.या नवीन पुलामध्ये वापरण्यात आलेली सळई (स्टील), सिमेंटचे ग्रेड आदींची तपासणीही या स्ट्रक्टवेल डिझायनर्समार्फत करण्यात आली. या नवीन पुलावर कोअर कटर या मशीनद्वारे वेगवेगळ्या चार ठिकाणी १०० मि.मी.चे खड्डे पाडून त्याची कोअर नमुन्यासाठी काढण्यात आली आहे.

गुरुवारी हे काम सुरू असताना मुंबईच्या ध्रुव कन्सल्टन्सी प्रा. लि. या कंपनीच्या अभियंत्यांसह राष्टÑीय रस्ते महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता संपत आबदार, व्ही. जी. गुळवणी, सहायक अभियंता प्रशांत मुंगाटे, आदी अधिकारी उपस्थित होते.कोअरची प्रयोगशाळेत तपासणीनवीन पुलावर कटरद्वारे काढण्यात आलेल्या चारही कोअर कंपनीच्या मुंबईतील प्रयोगशाळेत तपासण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलासाठी वापरण्यात आलेल्या सिमेंटचा दर्जा, गुणवत्ता, याचबरोबर वापरलेल्या स्टीलची काय स्थिती आहे याचीही तपासणी होणार आहे.

त्यामुळे ‘युएसपी, रिबॉन हॅमर व हाफसेल’ अशा तीन वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार आहेत, अशी माहिती जितेंद्र भुजबळ स्ट्रक्टवेल डिझायनर्स ब्रिज एक्स्पर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट इंजिनिअर पवन कदम, टेक्निकल डायरेक्टर जयंत कदम यांनी दिली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा