शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवा, शिवसेनेची मोर्चाद्वारे महापालिकेकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 18:17 IST

राष्ट्रीय फेरीवाला धोरणांनुसार आधी सर्व फेरीवाले, विक्रेते, केबिनधारक या सर्वांचे योग्य पुनर्वसन करावे, मगच अतिक्रमण विरोधी कारवाई राबवावी. सध्या ‘अतिक्रमणा’च्या नावाखाली जी फेरीवाल्यांना उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू आहे ती त्वरित थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मंगळवारी फेरीवाल्यांच्या मोर्चाद्वारे केली.

ठळक मुद्देशिवसेनेच्यावतीने महानगरपालिकेवर मोर्चा काढून निदर्शने कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांच्या विविध मागण्यामोर्चेकऱ्यांनी दिले अतिरिक्त आयुक्तांना निवेदन

कोल्हापूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांनुसार आधी सर्व फेरीवाले, विक्रेते, केबिनधारक या सर्वांचे योग्य पुनर्वसन करावे, मगच अतिक्रमण विरोधी कारवाई राबवावी. सध्या ‘अतिक्रमणा’च्या नावाखाली जी फेरीवाल्यांना उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू आहे ती त्वरित थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मंगळवारी फेरीवाल्यांच्या मोर्चाद्वारे केली.शिवसेनेने फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मंगळवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथून शिवसेनेने हा फेरीवाल्यांचा मोर्चा काढला.

मोर्चा निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे महानगरपालिकेसमोर आला. त्यावेळी आमदार राजेश क्षीरसागरही मोर्चात सहभागी झाले. यावेळी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, इस्टेट विभाग प्रमुख प्रमोद बराले हे मोर्चाला सामोरे गेले. आमदार क्षीरसागर यांनी पाटणकर यांना निवेदन देऊन अतिक्रमणविरोधी कारवाई आधी थांबवा, अशी मागणी केली.

कोल्हापूरसह महाराष्ट्रातून आलेल्या विक्रेत्यांना, फेरीवाल्यांना आधी जागा द्या, नंतरच बिहार, उत्तर प्रदेश येथून आलेल्यांना जागा द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली.महानगरपालिका करत असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे शहरातील अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उपासमारीची वेळ त्यांच्यावर येत आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आधी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना कायद्याचा बडगा दाखवत फेरीवाल्यांवर केलेला अन्याय अत्यंत जुलमी आहे.

हातावरचे पोट असलेल्या फेरीवाल्यांवरील कारवाई त्वरित थांबवावी, असे निवेदन मोर्चेकऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

ताराबाई रोड, महाद्वार रोड परिसरातील फेरीवाल्यांचे पुनर्वसन आहे त्याच जागी करण्यात यावे, अन्यथा सरस्वती चित्रमंदिरजवळील मोकळ्या जागेत संकुल उभे करून त्या ठिकाणी फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, असा पर्यायसुद्धा निवेदनात देण्यात आला आहे.

मोर्चाचे नेतृत्व आमदार क्षीरसागर यांच्यासह धनाजी दळवी, दीपक गौड, किशोर घाटगे, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, शामराव जाधव यांनी केले.

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना