शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयातील ‘आॅक्सिजन पार्क’च्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:39 IST

‘राजारामियन्स’ या माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पना आणि श्रमदानातून राजाराम महाविद्यालयात विविध वृक्षांचा ‘आॅक्सिजन पार्क’ साकारण्यात येत आहे. या पार्कच्या पहिल्या टप्प्याची सांगता आणि दुसर्‍या टप्प्याचा प्रारंभ खासदार संभाजीराजे आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

ठळक मुद्देराजाराम महाविद्यालयातील ‘आॅक्सिजन पार्क’च्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभपहिल्या टप्प्यातील वृक्षारोपण पूर्ण; ‘माजी राजारामियन्स’चा उपक्रम

कोल्हापूर : ‘राजारामियन्स’ या माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पना आणि श्रमदानातून राजाराम महाविद्यालयात विविध वृक्षांचा ‘आॅक्सिजन पार्क’ साकारण्यात येत आहे. या पार्कच्या पहिल्या टप्प्याची सांगता आणि दुसर्‍या टप्प्याचा प्रारंभ खासदार संभाजीराजे आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.‘माजी राजारामियन्स ग्रुप’तर्फे सन २०१६ पासून विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवीत येत आहेत. त्यांनी राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात आॅक्सिजन पार्क साकारण्याचे काम जूनमध्ये सुरू केले. या पार्कच्या पहिल्या टप्प्यात बेल, पिंपळ, वड, उंबर, सोनचाफा, बहावा, कांचन, आपटा, पळस, नारळ, आंबा अशा विविध ५५० वृक्षांचे रोपण केले आहे.

या पहिल्या टप्प्यातील वृक्षारोपणाची सांगता आणि दुसर्‍या टप्प्याचा प्रारंभ खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘माजी राजारामियन्स ग्रुप’तर्फे साकारण्यात येत असलेल्या आॅक्सिजन पार्कसह अन्य उपक्रमांना सर्वतोपरी मदत केली जाईल.

विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ‘माजी राजारामियन्स’ यांचा हा पर्यावरणपूरक उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. या कार्यक्रमास राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब खेमनर, रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश गुरव, कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते निवासराव साळोखे, धीरज पाटील, विजयकुमार माने, सुभाष माने, आशिष कोरगावकर, अमोल कुलकर्णी, शशिकांत पाटील, हेमंत पाटील, श्रीकांत सावंत, शशांक पाटील, दीपक जमेनिस, अंजली पाटील, सुनील धुमाळ, जब्बीन शेख, अर्पणा पाटील, रिमा शेळके-पाटील, आशिष घेवडे, दिलावर महात, अविनाश मिरजकर, डॉ. प्रवीण कोडोलीकर, मिलिंद दीक्षित, आदी उपस्थित होते.दुसर्‍या टप्प्यात हे होणारशिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या मागील परिसरातील दीड एकर परिसरातील या पार्कच्या पहिल्या टप्प्यात ज्या वृक्षांचे रोपण केले आहे. त्यांच्या जतन, संगोपनासह या वृक्षांसाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरविले जाणार असल्याचे ‘माजी राजारामियन्स ग्रुप’च्या शशिकांत पाटील यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Rajaram Collegeराजाराम कॉलेजkolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती