शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : लोकाग्रहास्तव ‘लोकमत महामॅरेथॉन’ नोंदणीसाठी सहा दिवसांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 11:30 IST

ऐतिहासिक वारशाच्या साक्षीने कोल्हापुरात दि. ६ जानेवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’ होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या महामॅरेथॉनच्या नोंदणीसाठी लोकाग्रहास्तव आणखी सहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे २६ डिसेंबर अखेर त्वरित नोंदणी करून कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेतील एका नव्या पर्वामध्ये सामील होण्याची संधी धावपटू आणि नागरिकांना उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देलोकाग्रहास्तव ‘लोकमत महामॅरेथॉन’ नोंदणीसाठी सहा दिवसांची वाढ२६ डिसेंबर नोंदणीचा अखेरचा दिवस; सहभागाबाबत मोठी उत्सुकता

कोल्हापूर : ऐतिहासिक वारशाच्या साक्षीने कोल्हापुरात दि. ६ जानेवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’ होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या महामॅरेथॉनच्या नोंदणीसाठी लोकाग्रहास्तव आणखी सहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे २६ डिसेंबर अखेर त्वरित नोंदणी करून कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेतील एका नव्या पर्वामध्ये सामील होण्याची संधी धावपटू आणि नागरिकांना उपलब्ध झाली आहे.नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच अ‍ॅथलिट क्रीडाप्रकाराला चालना मिळावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’च्या थराराच्या नोंदणीला कोल्हापूरकर क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्वांत लोकप्रिय अशा व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक सहा लाखांहून अधिक बक्षिसे असणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंची संख्या झपाट्याने वाढत आहे.

औरंगाबाद आणि नाशिकमधील ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या प्रचंड यशानंतर आता कोल्हापूरमध्ये दुसऱ्यांदा या वर्षी महामॅरेथॉन रंगणार आहे. महामॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटर अर्धमॅरेथॉन, १० कि.मी, ५ कि.मी., ३ कि.मी. फॅमिली रन यांसह २१ कि.मी.ची डिफेन्स रनही असणार आहे. चला तर मग, ‘धावणे’ही सवय बनविण्यासह स्वत:च्या आरोग्यासाठी धावण्याकरिता सज्ज होऊया.या महामॅरेथॉनमधील विजेत्यांना मेडल आणि रोख रकमेच्या स्वरूपातील बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. ‘लोकमत’ने कोल्हापूरकरांसह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक, क्रीडाप्रेमींसाठी या महामॅरेथॉनच्या माध्यमातून एक चांगली संधी उपलब्ध करून दिली असल्याची भावना विविध क्षेत्रांतील मान्यवर, खेळाडू आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

शहराचा नकाशा असणारे मिळणार ‘मेडल’या मॅरेथॉनमधील १० आणि २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक धावपटूला कोल्हापूरचा नकाशा असलेली मेडल्स देण्यात येणार आहेत. नाशिक आणि औरंगाबाद येथे झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना त्या-त्या शहराचा नकाशा असणारी मेडल्स दिली आहेत.

धावपटूने औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि पुणे, नागपूरमधील मॅरेथॉन पूर्ण करून मिळविलेली मेडल्स जुळविल्यास आपल्या ‘महाराष्ट्रा’चा नकाशा बनणार आहे. या पाच शहरांमधील मॅरेथॉन जिंकून हे मेडल पटकाविणारा धावपटू हा ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे.

लोकाग्रहास्तव ‘महामॅरेथॉन’च्या नोंदणीसाठी सहा दिवसांची वाढ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वासाठी धुमधडाक्यात नोंदणी सुरू झाली आहे. कोल्हापुरात गेल्या वर्षी ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद लाभला. आबालवृद्ध तंदुरुस्त राहावेत, या हेतूने या वर्षी आयोजित केलेली ही महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी), १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन तीन किलोमीटर अंतराची असणार आहे.

ती सर्वच वयोगटांसाठी खुली असणार आहे. त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे. विदेशातील स्पर्धकांनाही या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत गुरुवारपर्यंत होती. मात्र, वाढता सहभाग लक्षात घेऊन लोकाग्रहास्तव सहभाग नोंदणीसाठी आणखी सहा दिवसांची वाढ केली आहे. आता २६ डिसेंबर २०१८ ही नोंदणीसाठी अंतिम तारीख असणार आहे.

नावनोंदणीसाठी संपर्कया महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी  वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, मोबाईल नंबर (रोहन भोसले) ९६०४६४४४९४, ९८८१८६७६०० वर नोंदणी करता येणार आहे. 

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathonलोकमत कोल्हापूर महामॅरेथॉनkolhapurकोल्हापूर