Kolhapur: निवृत्ती चौकातील तलवार हल्ल्याप्रकरणी सहाजणांना अटक, सलग पाच दिवसाच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना यश

By सचिन भोसले | Published: June 3, 2023 10:24 PM2023-06-03T22:24:15+5:302023-06-03T22:25:49+5:30

Kolhapur: निवृत्ती चौकात ३१ मे रोजी बोंद्रनगर परिसरातील प्रकाश बोडकेवर तलवार हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहा हल्लेखोरांना शनिवारी जुना राजवाडा पोलिसांनी पनोरी (ता.पन्हाळा) येथून अटक केली.

Kolhapur: Six arrested in Nivritti Chowk sword attack case, police succeed after five consecutive days of search operation | Kolhapur: निवृत्ती चौकातील तलवार हल्ल्याप्रकरणी सहाजणांना अटक, सलग पाच दिवसाच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना यश

Kolhapur: निवृत्ती चौकातील तलवार हल्ल्याप्रकरणी सहाजणांना अटक, सलग पाच दिवसाच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना यश

googlenewsNext

- सचिन भोसले
कोल्हापूर - निवृत्ती चौकात ३१ मे रोजी बोंद्रनगर परिसरातील प्रकाश बोडकेवर तलवार हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहा हल्लेखोरांना शनिवारी जुना राजवाडा पोलिसांनी पनोरी (ता.पन्हाळा) येथून अटक केली. गुन्ह्यामध्ये दहा संशयितांमध्ये तीन अज्ञात असून विकास ऊर्फ चिक्या हा अद्याप बेपत्ता आहे. तर युवराज शेळके, कृष्णात बोडेकर, केदार करण शेळके, राहूल हेगडे, राजू बोडके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.

लक्षतीर्थ-बोंद्रनगरातील पूर्वैमनस्यातून बुधवारी शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातील कार्यालयात भरदुपारी पाठलाग करून प्रकाश बोडकेवर संतोष बोडके गॅंगमधील संशयितांनी खुनी हल्ला केला. त्यांना शोधण्यासाठी जुना राजवाडा पोलिसांसह इतर पोलिस ठाण्यातील पथकांनी अहोरात्र प्रयत्न केले अखेर शुक्रवारी दुपारी त्यांना पनोरी (ता.पन्हाळा) येथून अटक केली.

Web Title: Kolhapur: Six arrested in Nivritti Chowk sword attack case, police succeed after five consecutive days of search operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.