शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :‘शेकाप’ची सायकल रॅली, पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 11:38 IST

सामान्य जनता दररोज वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे होरपळत आहे. दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही, या दरवाढीविरोधात भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकल रॅली काढून सरकारचा तीव्र निषेध केला.

ठळक मुद्देकोल्हापूर :‘शेकाप’ची सायकल रॅली पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध

कोल्हापूर : सामान्य जनता दररोज वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे होरपळत आहे. दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही, या दरवाढीविरोधात भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकल रॅली काढून सरकारचा तीव्र निषेध केला.टेंबे रोड येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालय येथून दुपारी सायकल रॅलीस प्रारंभ झाला. याप्रसंगी ‘अच्छे दिन’च्या नावाने जनतेला फसविणाऱ्या मोदी व फडणवीस सरकारचा निषेध असो’, ‘खोटी जाहिरातबाजी करणाऱ्या सरकाचा निषेध असो’ अशा जोरदार घोषणा देऊन मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. बैलगाडीमध्ये मोटारसायकल ठेवून प्रतीकात्मक निषेध ही यावेळी नोंदविला.मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका मार्ग शिवाजी चौक येथे या सायकल रॅलीची सांगता झाली. यावेळी बोलताना पक्षाचे शहर चिटणीस बाबूराव कदम म्हणाले, भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने फसवी निघाली आहेत.

पेट्रोल व डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. सामान्य माणूस या भडक्यात अक्षरश: होरपळून निघाला आहे. मात्र, सरकार फक्त जाहिरातबाजी करून जनतेची फसवणूक करत आहे. या निषेधात ही सायकल रॅली काढण्यात आली आहे.आंदोलनात संभाजी जगदाळे, टी. एस. पाटील, स्वप्निल पाटोळे, महेश चव्हाण, विश्वजित देवकर, मधुकर हरेर, संग्राम माने, सुभाष सावंत, महेश लोढे, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूरPetrolपेट्रोल