शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

कोल्हापूर :शाहू , फुलेंना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीचे शरद पवारांकडून समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 16:06 IST

महात्मा जोतिबा फुले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास फुले - शाहू यांचा सन्मान तर होईलच पण खऱ्या अर्थाने या पुरस्काराचीही प्रतिष्ठा वाढेल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देशाहू , फुलेंना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीचे पवारांकडून समर्थनखऱ्या अर्थाने ‘भारतरत्न’ पुरस्काराची प्रतिष्ठा वाढेल

कोल्हापूर : महात्मा जोतिबा फुले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास फुले - शाहू यांचा सन्मान तर होईलच पण खऱ्या अर्थाने या पुरस्काराचीही प्रतिष्ठा वाढेल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदारशरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.येथील लोकराजा फोरम, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहंूच्या चित्रमय पुस्तक प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून खा. पवार बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती होते.महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी तर राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत केली होती. या मागणीचे समर्थन पवार यांनी केले.

ही मागणी केल्याबद्दल मी या दोघांचे अभिनंदन करतो, असे सांगून पवार म्हणाले, समाजाच्या उध्दारासाठी काम करणाऱ्या महात्मा फुले आणि शाहू महाराज यांना भारतरत्न देण्याच्या मागणीकडे केंद्र सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही. या महापुरुषांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास त्या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढणार आहे.

आज शेती क्षेत्र कमी होत असून शेती किफायतशीर राहिलेली नाही. शेतकरी अल्पभूधारक झाला आहे. आतबट्टयात आला आहे. यामुळे राज्यात आत्महत्त्या वाढलेल्या आहेत. परंतु शाहू महाराजांनी संस्थान काळात शेतीला पूरक उद्योग सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.

त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात शेतकऱ्यांतूनच उद्योजक तयार झाले. शेती संपन्न कशी होईल यासाठी शाहूंनी प्रयत्न केले. प्रशासनाने शेतकाऱ्यांशी कसे वागावे, कसे काम करावे याबाबत काढलेले आज्ञापत्र आजही शासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणारे आहे, असे पवार म्हणाले.शासन जनतेचे काम करत नाही, त्यांचे प्रश्न सोडवत नाही अशा वेळी क्रांती घडते. आज शाहू महाराजांचे विचार देशाला लागू पडत आहेत. पण केंद्र व राज्य सरकार हे विचार किती मनापासून अंमलात आणते हा प्रश्नच आहे. पण शरद पवार गेले अनेक वर्षे शाहूंचे विचार पुढे नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत, असे उद्गार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी काढले.प्रारंभी फोरमचे अध्यक्ष दिपक दळवी, पुस्तकाचे लेखक उमेश सूर्यवंशी यांनी पुस्तकाची संकल्पना स्पष्ट केली. यावेळी आमदार हेमंत टकले, महापौर शोभा बोंद्रे यांचे भाषण झाले. समारंभात बांधकाम व्यवसायिक व्ही. बी. पाटील, डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह काही मान्यवरांचे शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

फोरमच्या वेबसाईटचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले. संदीप बोरगांवकर यांनी आभार मानले. पंडीत कंदले यांनी सुत्रसंचालन केले. समारंभास खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, उपमहपौर महेश सावंत, माजी खासदार कल्लाप्पा आवाडे, प्रकाश आवाडे, संजय मंडलिक, के.पी. पाटील, राजेश लाटकर उपस्थित होते.

इजिप्तच्या शेतात कोल्हापूरचे इंजिनइजिप्त देशाच्या दौऱ्यांतील एक आठवण शरद पवार यांनी समारंभात सांगितली. १९६० ६२ च्या सुमारास आपण इजिप्तमध्ये फिरत असताना एका शेतात एक विशिष्ट प्रकारचा आवाज माझ्या कानावर आला. तेंव्हा आम्ही तेथे जाऊन पाहणी केली. इंजिनाद्वारे पाणी उपसा करुन शेतीला पुरवठा केले जात होते. सहाजिकच इंजिन कुठले आहे याची चौकशी केली तर ते कोल्हापुरातील असल्याचे कळले. शाहू महाराजांच्या दुरदृष्टीचे हे एक उत्तम उदाहरण आहे, असे पवार यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूर