शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जीवन मुक्ती सेवा संस्थेतर्फे सोमवारी ‘शहीद दिन’, बल्साडच्या सलीम शेख यांना ‘व्हाईट आर्मी शौर्य पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 18:38 IST

कोल्हापूर : जीवन मुक्ती सेवा संस्थातर्फे (व्हाईट आर्मी) वीर जवान अभिजित सूर्यवंशी स्मृतिदिन आणि संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (दि. २५) सायंकाळी सहा वाजता शहीद दिनाचा कार्यक्रम होणार आहे. यात शहीद जवानांना अभिवादन, मशाल ज्योत मिरवणूक आणि पुरस्कार वितरण होईल. यामध्ये यावर्षी बलसाड (गुजरात) येथील बसचालक सलीम गफूर शेख यांना ‘ व्हाईट ...

ठळक मुद्देजीवन मुक्ती सेवा संस्थातर्फे (व्हाईट आर्मी) वर्धापनदिन, वीर जवान अभिजित सूर्यवंशी स्मृतिदिन शहीद जवानांना अभिवादन, मशाल ज्योत मिरवणूक, पुरस्कार वितरण बलसाड (गुजरात) येथील बसचालक सलीम गफूर शेख यांना ‘व्हाईट आर्मी शौर्य पुरस्कार’

कोल्हापूर : जीवन मुक्ती सेवा संस्थातर्फे (व्हाईट आर्मी) वीर जवान अभिजित सूर्यवंशी स्मृतिदिन आणि संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (दि. २५) सायंकाळी सहा वाजता शहीद दिनाचा कार्यक्रम होणार आहे. यात शहीद जवानांना अभिवादन, मशाल ज्योत मिरवणूक आणि पुरस्कार वितरण होईल. यामध्ये यावर्षी बलसाड (गुजरात) येथील बसचालक सलीम गफूर शेख यांना ‘व्हाईट आर्मी शौर्य पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती ‘जीवन मुक्ती’चे संस्थापक-अध्यक्ष अशोक रोकडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.संस्थापक-अध्यक्ष रोकडे म्हणाले, या कार्यक्रमास अदृश काडसिद्धेश्वर स्वामी आणि विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे प्रमुख उपस्थित असणार आहेत. अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यातून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता बसमधील सर्व यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी नेऊन बसचालक सलीम गफूर शेख यांनी त्या सर्वांचा जीव वाचविला. त्यांना यावर्षीचा ‘व्हाईट आर्मी शौर्य पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.

स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जगातील विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आणि अतिरेकी, दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेले निरपराध लोक आणि देशसंरक्षणासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांना अभिवादन केले जाणार आहे.

यावेळी बिंदू चौकामध्ये बालकल्याण संकुल, अंधशाळा, हेल्पर्स आॅफ दि हॅँडिकॅप्ड, चेतना विकास मंदिर, अवनी, स्वयम, करुणालय, जिज्ञासा या संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या हस्ते श्रद्धादीप प्रज्वलित केला जाईल. तत्पूर्वी व्हाईट आर्मीच्या जवानांची मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, शिवाजी चौक ते बिंदू चौक मार्गावर मशाल ज्योत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस सचिन भोसले, अझरुद्दीन शेख उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGujaratगुजरात