प्रतापगड यात्रेकरिता व्हाईट आर्मी सज्ज

By admin | Published: March 4, 2016 01:52 AM2016-03-04T01:52:31+5:302016-03-04T01:52:31+5:30

जिल्हयात महाशिवरात्री सणाच्या निमित्ताने प्रतापगड येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रेचे आयोजन केले जाते.

White Army ready for Pratapgad Yatra | प्रतापगड यात्रेकरिता व्हाईट आर्मी सज्ज

प्रतापगड यात्रेकरिता व्हाईट आर्मी सज्ज

Next

गोंदिया : जिल्हयात महाशिवरात्री सणाच्या निमित्ताने प्रतापगड येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रेचे आयोजन केले जाते. या दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये व भाविकांना यात्रेचा आनंद मोकळेपणाने घेता यावा याकरिता व्हाईट आर्मी सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कळविले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत व्हाईट आर्मी यात्रेत सहभागी करु न घेण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, पोलिस उपअधीक्षक गृह सूरेश भंवर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक धूमाळ, संबंधित विभागाचे अधिकारी व व्हाईट आर्मीचे व्हॉलींटिअर्स उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी यात्रेदरम्यान स्वच्छता, शांतता व सूव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक प्रशासन यंत्रणेला मदत करण्याचे काम व्हाईट आर्मीद्वारे केले जाईल असे सांगितले.
व्हाईट आर्मीची जबाबदारी व कामाचे स्वरु प सांगताना त्यांनी फायर अ‍ॅन्ड सेफ्टी, प्रथमोपचार यासारखी कामे करावी असे सांगितले. तसेच व्हाईट आर्मीने त्यांच्या कामाचे नियोजन, माहिती, केलेली कार्यवाही व समस्येवर केलेली उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती पोलिस विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या बैठकीमध्ये प्रतापगड यात्रेतील पार्र्कींंगव्यवस्था, विद्युत पुरवठा, स्वच्छ पाण्याचा पुरवठा, कचरा व घाण टाळण्यासाठी केलेले उपाय, असामाजिक तत्वाद्वारे पसरविल्या जाणार्या अफवा, चेंगरा-चेंगरी व गिर्दच्या ठिकाणी वेळेवर उद्भवणार्या समस्या या विषयांवर चर्चा करण्यात आली. युवकांनी व्हाईट आर्मीत सहभागी होण्याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचेशी संपर्क साधावा अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सूर्यंवंशी यांनी यावेळी दिली.
(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: White Army ready for Pratapgad Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.