शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

कोल्हापूर : कर्जमाफीच्या खात्यांचे उद्यापासून ‘आॅडीट’, ८० हजार खाती तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:21 IST

राज्य सरकारच्या कर्जमाफीतील लाभार्थी खात्यांचे लेखापरीक्षण (आॅडीट) उद्यापासून (दि. ३०) सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ८० लेखापरीक्षकांच्या माध्यमातून सुमारे ८० हजार कर्जमाफी खात्यांची तपासणी केली जाणार आहे.

ठळक मुद्दे१ लाख ८५ हजार ५०० खातेदारांना ३५९ कोटींची कर्जमाफी साडेचौदा हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीतील लाभार्थी खात्यांचे लेखापरीक्षण (आॅडीट) उद्यापासून (दि. ३०) सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ८० लेखापरीक्षकांच्या माध्यमातून सुमारे ८० हजार कर्जमाफी खात्यांची तपासणी केली जाणार आहे.केंद्र सरकारने २००८ मध्ये केलेल्या कर्जमाफीत मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्या होत्या. ही कर्जमाफी देशभरात चर्चेत राहिली होती, अजूनही न्यायालयीन प्रक्रियेत ही कर्जमाफी अडकली आहे. ही कर्जमाफी पारदर्शक व पात्र शेतकऱ्यांनाच व्हावी, यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारल्यापासून सरकारने दक्षता घेतली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा बॅँक व राष्ट्रीयकृत बॅँकांच्या माध्यमातून १ लाख ८५ हजार ५०० खातेदारांना ३५९ कोटींची कर्जमाफी झाली आहे. या खात्यांचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. कर्जमाफीचे निकष, अर्ज व प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ याची तपासणी केली जाणार आहे.

आजपासूनच कर्जमाफीच्या खात्यांची तपासणी केली जाणार होती, पण ‘जी. डी. सी. अ‍ॅण्ड ए.’ परीक्षेत सहकार खात्याचे अधिकारी गुंतले आहेत. त्यामुळे उद्यापासून लेखापरीक्षणाचे काम करण्याची तयारी सहकार व लेखापरीक्षण विभागाने केली आहे.

साडेचौदा हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षाकर्जमाफीत पात्र आहेत, पण कर्जमाफीच्या रकमेपेक्षा कमी-अधिक रक्कम आल्याने १४ हजार ५०० खात्यांना लाभ झालेला नाही. रकमा दुरुस्त केल्या पण सिस्टीम स्वीकारत नसल्याने हे शेतकरी अद्याप वंचित आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर