शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोल्हापूर : सावित्रींनी जपला ‘शाहूं’चा वसा, भाजप ओबीसी महिला मोर्चाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 5:43 PM

कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकमेव शाहूंच्या नावे असलेल्या गंगावेशीतील शाहू उद्यानाचा फलकच गायब झाला होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘शाहू उद्यानचा महापलिकेला विसर’ अशी बातमी मंगळवारी (दि.२६) प्रसिद्ध झाली होती. तिची दखल घेत भाजप ओबीसी महिला आघाडीतर्फे उद्यानाचा फलक लावून सामजिक बांधीलकी जपली.

ठळक मुद्देसावित्रींनी जपला ‘शाहूं’चा वसाभाजप ओबीसी महिला मोर्चाचा पुढाकार

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या एकमेव शाहूंच्या नावे असलेल्या गंगावेशीतील शाहू उद्यानाचा फलकच गायब झाला होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘शाहू उद्यानचा महापलिकेला विसर’ अशी बातमी मंगळवारी (दि.२६) प्रसिद्ध झाली होती. तिची दखल घेत भाजप ओबीसी महिला आघाडीतर्फे उद्यानाचा फलक लावून सामजिक बांधीलकी जपली.बुधवारी वटपौर्णिमेनिमित्त ‘भाजप ओबीसी महिला आघाडी’च्या महिला शाहू उद्यानात असलेल्या वडाची पूजेसाठी एकत्र जमल्या. तिथे आल्यानंतर त्यांनी ‘शाहूंच्या नावाने फलक लावण्याचा’ संकल्प केला. तो तत्काळ अंमलात आणत या सावित्रींनी शाहूंचा वसा जपला.गंगावेसमधील शाहू उद्यानात गुरुवारी सकाळी अकरा वाजता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.यावेळी महेश जाधव म्हणाले, शाहूंच्या नावाने असणाऱ्या या उद्यानाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे त्वरित लक्ष द्यावे. या उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी लागणारी मदत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून केली जाईल.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप कुंभार, भाजप ओबीसी मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष राजू कुंभार, आकाश चिखलकर, लखन निगवेकर, रवी चिले,दिलीप पालकर, आदित्य माजगावंकर, तानाजी वडर, अभी पोवार, दीपक गावडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी भागातील नागरिकांसह महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

आम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी शाहू उद्यानात सर्वजणी पूजेसाठी एकत्र जमल्यानंतर शाहू उद्यानाच्या सद्य:स्थितीची चर्चा झाली व सर्वानुमते आम्ही शाहूंच्या नावाचा फलक लावण्याचा निर्णय घेतला. आज तो प्रत्यक्षात साकारला.- विद्या बनछोडे, अध्यक्षा भाजप ओबीसी महिला मोर्चा

या साविंत्रींनी जपला शाहूंचा वसाचिनार गाताडे, छाया शिंदे, विद्या बागडी, सविता पाडळकर, राजश्री कोळेकर, श्रद्धा मेस्त्री, सोनल शिंदे, समिना मस्तनावाले, वर्षा कुंभार 

 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर