शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :वाफेच्या तंत्रज्ञानाने खर्च, श्रम, इंधनाची बचत : बिलेनबर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:48 IST

शाहू मार्केट यार्ड येथील छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी-विक्री संघातर्फे संघाच्या हॉल येथे आयोजित नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे संपूर्णत: वाफेवर गूळ निर्मिती मार्गदर्शन कार्यक्रमात अमेरिकेच्या व्हीलेज इंडस्ट्रीयल पॉवर कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी कार्ल बिलेनबर्ग प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देवाफेच्या तंत्रज्ञानाने खर्च, श्रम, इंधनाची बचत : बिलेनबर्ग वाफेवर गूळनिर्मितीच्या तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन कार्यक्रमशाहू गूळ खरेदी-विक्री संघातर्फे आयोजन

कोल्हापूर : नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे पूर्णपणे वाफेवर गूळ निर्मिती केल्यास खर्च, श्रम आणि इंधनाची बचत होते. त्यामुळे हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे, असे प्रतिपादन अमेरिकेच्या व्हीलेज इंडस्ट्रीयल पॉवर कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी कार्ल बिलेनबर्ग यांनी गुरुवारी येथे केले.शाहू मार्केट यार्ड येथील छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी-विक्री संघातर्फे संघाच्या हॉल येथे आयोजित नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे संपूर्णत: वाफेवर गूळ निर्मिती मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

यावेळी संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील, कृषी विभागाचे कोल्हापूर विभागीय सहसंचालक महावीर जंगटे, सेंद्रीय शेतीतज्ज्ञ ज्योतिकुमार पाटील, पश्चिम महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे आदींची होती.बिलेनबर्ग म्हणाले, साखर कारखान्यात बगॅस जाळून वाफ तयार करून रस उकळला जातो. यासाठी जे काही इंधन जळते व त्यातून मिळणाऱ्या वाफेतून एकाचवेळी एकापेक्षा अधिक काहिलींना ही ऊर्जा मिळते. त्याच पद्धतीने वाफेवर गूळ निर्मिती करण्याची पद्धत आहे. यामुळे वेळ, श्रम, इंधनाची बचत होते. यापूर्वी केनियामध्ये या नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे वाफेवर आंब्याच्या रस गरम करून उत्पादन तयार करण्यात आले आहे.

महाराष्ट्रत उसाचे उत्पादन जादा आहे. त्यामध्ये अजूनही गूळनिर्मितीकडे शेतकऱ्यांचा ओढा असल्याने त्यांना या नवतंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी प्रसार केला जात आहे. या नवतंत्रज्ञानासाठी देशातील मुख्य केंद्र हे पुण्यातील उरळी कांचन येथे करण्यात येणार आहे.महावीर जंगटे म्हणाले, सेंद्रीय गुळाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर निर्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. खर्च व मनुष्यबळ कमी लागत असल्याने वाफेवर गूळ निर्मितीच्या नवतंत्रज्ञानाचा चांगल्या पद्धतीने वापर होईल. त्याचबरोबर राज्य सरकारने नवीन कृषी उद्योगांसाठी ‘मुख्यमंत्री कृषी प्रक्रिया योजना’ आणली आहे. त्यामध्ये गुळाचाही समावेश करण्यात आला आहे.राजाराम पाटील यांनी वाफेवर गूळनिर्मितीच्या तंत्रज्ञानाचा कोल्हापूरात प्रकल्प करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, सेंद्रीय घटक वापरून अन्न व औषध प्रशासनाच्या नियमावलीनुसार गूळनिर्मिती केल्याबद्दल तुगरी (ता. उदगीर, जि. लातूर) येथील कैलास पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड