कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी ‘रस्त्यावर’

By Admin | Updated: December 12, 2014 23:43 IST2014-12-12T23:11:16+5:302014-12-12T23:43:11+5:30

संजय घोडावत : घोडावत इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी मंगळवारी करणार आंदोलन; बिल्डो प्रदर्शनास प्रारंभ

Kolhapur-Sangli road to 'Road' | कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी ‘रस्त्यावर’

कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी ‘रस्त्यावर’


कोल्हापूर : कोल्हापूर-सांगलीतून सरकारला २०० कोटी रुपयांचा रोड टॅक्स दिला जातो. मात्र, त्याच्या दहा टक्केदेखील रक्कम रस्त्यांवर खर्च होत नाही. या रस्त्याचे चौपदरीकरण रखडल्यामुळे अपघात होऊन अनेकांना जिवाला मुकावे लागत आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. १६) घोडावत इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी रस्त्यावर उतरून अंकली पुलाजवळ आंदोलन करणार असून, यात सहभागी व्हावे, असे आवाहन उद्योगपती संजय घोडावत यांनी आज, शुक्रवारी येथे केले. येथील मेरी वेदर मैदानावर असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्सच्या ‘बिल्डो २०१४’ या बांधकामविषयक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महालक्ष्मी स्टीलचे जितेंद्र गांधी प्रमुख उपस्थित होते.
घोडावत म्हणाले, कोल्हापूरला मागितल्याशिवाय काही मिळत नाही. विमानतळ बंद असून, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सरकारची कसलीही मदत नसल्याने येथील विकास खुंटला आहे. कामाची मुदत उलटली, तरी कोल्हापूर-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण झालेले नाही. एक सामाजिक प्रश्न म्हणून घोडावत इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी मंगळवारी आंदोलन करणार आहेत.
‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष गिरीश रायबागे, अर्थमूव्हिंग असोसिएशनचे अध्यक्ष भैयासाहेब घोरपडे, ‘ट्रीपल आय’चे नवीन लाड, ‘आयआयए’चे निशिकांत गोरुले, अनंत खासबारदार, बलराम महाजन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुधीर राऊत, अभिजित जाधव, मधुकर पवार, शिवाजी पाटील, उमेश कुंभार, कालिका स्टीलचे प्रवीण शर्मा, आदी उपस्थित होते. संदीप घाटगे यांनी स्वागत, तर मुग्धा गोरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

कोल्हापुरात शुक्रवारी असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्सच्या ‘बिल्डो २०१४’ या बांधकामविषयक प्रदर्शनाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना उद्योगपती संजय घोडावत. शेजारी डावीकडून अभिजित जाधव, संदीप घाटगे, मिलिंद पाटील, जितेंद्र गांधी, मधुकर पवार, सुधीर राऊत, रवी पाटील उपस्थित होते.

Web Title: Kolhapur-Sangli road to 'Road'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.