शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कोल्हापूर : उद्योगपतीला साडेचार लाखांचा गंडा, हॅकर्सने काढले एटीएमवरुन परस्पर पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 15:02 IST

कोल्हापूर, बेळगाव येथील एटीएमवरुन हॅकर्सने परस्पर साडेचार लाख रुपये काढून उद्योगपतीची फसवणूक केलेचे रविवारी (दि. २१) उघडकीस आले. याप्रकरणी अनोळखी हॅकर्सवर राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्दे उद्योगपतीला साडेचार लाखांचा गंडा हॅकर्सने काढले एटीएमवरुन परस्पर पैसे

कोल्हापूर : कोल्हापूर, बेळगाव येथील एटीएमवरुन हॅकर्सने परस्पर साडेचार लाख रुपये काढून उद्योगपतीची फसवणूक केलेचे रविवारी (दि. २१) उघडकीस आले. याप्रकरणी अनोळखी हॅकर्सवर राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.अधिक माहिती अशी, अब्दूलकादर नजीर अहमद काझी (वय ४९, रा. शिंदे कॉलनी, सम्राटनगर) यांचा गोकुळ शिरगाव येथे कारखाना आहे. ते मूळचे बारामतीचे २०१० पासून कोल्हापूरात कुटूंबासह राहतात. त्यांचे कारखाना व वैयक्तीक आर्थिक व्यवहारांची देवाण-घेवाण बारामती येथील आयडीबीआय बँकेतून आॅनलाईनद्वारे होते. दोन दिवसापूर्वी ते चित्रपट पाहण्यासाठी गेले.

तिकीट काढलेनंतर त्यांनी एटीएमवरुन त्याचे पैसे भरले. यावेळी त्यांच्या मोबाईलवर बॅकेत बॅलेन्स किती शिल्लक आहे, त्याचा मॅसेज आला. खात्यात शिल्लक असलेल्या बॅलेन्सवरुन साडेचार लाख रुपये कमी झालेचा मॅसेज पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी राजारामपूरी येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत जावून पासबुक भरले असता यापूर्वी ३० वेळा एटीएमवरुन पैसे काढलेचे दिसून आले. त्यांनी आपण पैसे काढले नसल्याचे बँक प्रशासनाला सांगितले.

बँकच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी काझी यांचे एटीएमवरील व्यवहार बंद केले. आपल्या खात्यावरुन प्रतिभानगर येथील स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, आजरा बँक आणि बेळगाव येथील एका बँकेच्या एटीएम सेंटरवरुन परस्पर पैसे काढल्याचे स्टेटमेंन्ट बँकेने दिले.

संशयित हॅकर्सने काझी यांच्या एटीएम नंबरवरुन आॅनलाईन सिस्टीमद्वारे खात्यावरील पैसे परस्पर काढलेचे निष्पन्न झाले. काझी यांना बँकेकडून खात्यावरील पैसे कमी झालेचा मॅसेज न आल्याने त्यांचे लक्षात आले नाही. पोलीस संबधीत एटीएम सेंटरवरील सीसीटीव्ही फुटेजवरुन संशयिताचा शोध घेत आहेत.हॅकर्सचे कोल्हापूरात वास्तवएटीएम मशीनला स्कीमर बसवून जगभरातील विविध बँकांतील ग्राहकांच्या खात्यांवरील आॅनलाईन सिस्टीम हॅक करून त्यावरून कोट्यवधी रुपये लुटणाऱ्या दोघा रुमानियन परदेशी हॅकर्सना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली होती. असे आणखी काही हॅकर्स कोल्हापूरात वास्तव्यास असून त्यांनी काझी सारखा अनेकांना गंडा घातला घातल्याची शंका आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर