शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सेवानिवृत्त प्राध्यापकांनी शिक्षण सहसंचालकांना प्रस्ताव द्यावेत : मानसिंग जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 16:20 IST

सन २००६-०९ मधील सेवानिवृत्त प्राध्यापकांनी सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी उच्चशिक्षण सहसंचालकांना प्रस्ताव द्यावेत. त्याबाबत काही समस्या असल्यास त्यांनी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशन आॅफ कॉलेज अ‍ॅन्ड युनिव्हर्सिटी सुपर एॅन्युएटेड टीचर्सचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष डॉ. मानसिंगराव जगताप यांनी केले.

ठळक मुद्देसेवानिवृत्त प्राध्यापकांनी शिक्षण सहसंचालकांना प्रस्ताव द्यावेत : मानसिंग जगतापपाचव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतनामध्ये सुधारणा

कोल्हापूर : सन २००६-०९ मधील सेवानिवृत्त प्राध्यापकांनी सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी उच्चशिक्षण सहसंचालकांना प्रस्ताव द्यावेत. त्याबाबत काही समस्या असल्यास त्यांनी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशन आॅफ कॉलेज अ‍ॅन्ड युनिव्हर्सिटी सुपर एॅन्युएटेड टीचर्सचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष डॉ. मानसिंगराव जगताप यांनी केले.कदमवाडी येथील भारती विद्यापीठामध्ये झालेल्या या असोसिएशनच्या बैठकीत ते बोलत होते. डॉ. जगताप म्हणाले, सन २००६-०९ मधील सेवानिवृत्त प्राध्यापकांना त्यांनी घेतलेल्या शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तीवेतन हे सहाव्या वेतन आयोगानुसार देण्याचा निर्णय झाला आहे. त्याबाबतचा शासकीय आदेश दि. २८ डिसेंबर २०१८ रोजी काढला आहे.

पाचव्या वेतनामध्ये सेवानिवृत्त झालेल्या सभासदांची ही निवृत्तीवेतन सुधारित होत आहे. त्याबाबतचे प्रस्ताव या सेवानिवृत्त प्राध्यापकांनी महाविद्यालय आणि प्राचार्यांच्या माध्यमातून कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना सादर करावेत. या बैठकीस प्रा. मारुतराव मोहिते, डी. यु. पवार, अशोकराव जगताप, माधव घाडगे, संभाजीराव पाटील, विद्या कुरणे, व्ही. के. मोरे, आदी उपस्थित होते.

औरंगाबादमध्ये ११ जानेवारीला बैठकअखिल भारतीय प्राध्यापक प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य एम. ए. वाहुळ, प्राचार्य डॉ. शफी यांचा अमृतसोहळा दि. ११ जानेवारीला औरंगाबाद येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. या कार्यक्रमानंतर दुपारी तीन वाजता राज्य संघटनेची बैठक आहे. त्यामध्ये सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा होणार आहे, असे डॉ. जगताप यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर