शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
4
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
5
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
6
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
7
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
8
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
9
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
10
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
11
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
12
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
13
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
14
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
15
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
16
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
18
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
19
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
20
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकर फिरणार १३१ देशात; गेल्या पाच वर्षांत किती जणांनी काढले आंतरराष्ट्रीय वाहन परवाने... वाचा

By सचिन यादव | Updated: November 14, 2025 18:03 IST

भारताबाहेर प्रवास करताना, एखाद्याला स्वत : वाहन चालवून रोड ट्रिपचा आनंद घ्यायचा असतो. परंतु भारतीय परवाना फक्त भारतातच वैध असतो

सचिन यादवकोल्हापूर : नोकरीनिमित्त अनेक कोल्हापूरकर विदेशात आहेत. तेथे काहीजण वाहन चालविण्यासाठी इच्छुक असतात. या हौसेपोटी कोल्हापूरकरांनी गेल्या पाच वर्षांत १,६२३ आंतरराष्ट्रीय वाहन परवाने काढले आहेत. या आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याच्या आधारे १३१ देशांत वाहन चालविता येऊ शकते.भारताबाहेर प्रवास करताना, एखाद्याला स्वत : वाहन चालवून रोड ट्रिपचा आनंद घ्यायचा असतो. परंतु भारतीय परवाना फक्त भारतातच वैध असतो. देशाबाहेर वाहन चालवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज असते. हा परवाना मोटारचालकांना त्यांनी प्रवास केलेल्या देशात कायदेशीररीत्या परवानाधारकचालक म्हणून ओळखले जातात.

आंतरराष्ट्रीय परवाना काढण्यासाठी अटी

  • वाहनपरवाना बंधनकारक
  • भारतीय नागरिकत्व
  • अर्ज क्रमांक ए भरावा लागेल
  • देशाचे नाव, किती दिवसांचा प्रवास

एक वर्षासाठी परवाना वैधआंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची वैधता १ वर्षाची असते. त्यानंतर या परवान्याची मुदत संपते. हा परवाना परत नूतनीकरण होत नाही. त्यासाठी पुन्हा नवा अर्ज करून नवा परवाना काढावा लागतो. जवळपास १३१ देशांमध्ये हा परवाना ग्राह्य मानला जातो.

वैद्यकीय प्रमाणपत्रआंतरराष्ट्रीय वाहन परवान्यासाठी सीएमवी-४ फॉर्म भरल्यानंतर त्यावर डॉक्टरची सही घ्यावी लागते. परवान्यासाठी अर्ज करत असताना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याची तपासणी डॉक्टरांच्याकडून होते.

आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • भारतीय वाहन परवाना
  • पासपोर्ट पुढील सहा महिन्यांसाठी वैध
  • अर्जासोबत चार पासपोर्ट आकाराचे फोटो
  • व्हिजाच्या दोन कॉपी
  • पासपोर्टची कॉपी, परदेशातील जाण्या-येण्याच्या तिकिटाची कॉपी
  • एक हजार रुपये शुल्क

दहा वर्षांच्या तुलनेत संख्या घटली२०१५ ते ऑक्टोबर २०२० पर्यंत आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढण्यासाठी संख्या अधिक होती. या कालावधीत कोल्हापूरकांनी पाच हजार आंतरराष्ट्रीय परवाने काढले होते. मात्र काही देशात सुरू झालेले युद्ध, बदलेली सामाजिक परिस्थिती, नोकरीवर गंडातर, कौटुंबिक अडचणीमुळे मायदेशी परत आले. सध्या ही संख्या दुप्पटीने कमी झाली आहे.आंतरराष्ट्रीय परवाने का?काही देशात भाडेतत्त्वावरील कार परवडण्यासारखी नसते. काहींचा दररोजचा प्रवास असतो. त्यामुळे नोकरीसाठी परदेशात गेलेले बहुतांशी लोक आंतरराष्ट्रीय परवाने काढतात.

परवान्याची संख्या२०२०-२१ : १२३२०२१-२२: २९२२०२२-२३ : ४४०२०२३-२४ : ४०३२०२४-२५ (ऑक्टोबरअखेर) ३६५

सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आठवडाभरात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो. त्यासाठी एक हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. -संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Residents Drive Abroad: International Driving Permits Surge in Popularity

Web Summary : Over the past five years, 1,623 Kolhapur residents obtained international driving permits, enabling them to drive in 131 countries. The permit is valid for one year and requires specific documentation, including a valid Indian license and passport. While popular, permit numbers have decreased since 2015.