शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘उज्ज्वला’चे उर्वरित ३० हजार लाभार्थी मार्चपर्यंत पूर्ण करणार: अलोक कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 16:02 IST

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार लाभार्थ्यांना गॅस जोडणी दिली आहे. आता १८ डिसेंबरपासून दुसरा टप्पा सुरू झाला असून, मार्चपर्यंत उर्वरित ३० हजार जणांना गॅस जोडणी देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलियमचे वरिष्ठ अधिकारी अलोक कुमार यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे ‘उज्ज्वला’चे उर्वरित ३० हजार लाभार्थी मार्चपर्यंत पूर्ण करणार: अलोक कुमारआतापर्यंत १ लाख ४५ हजार जणांना गॅस जोडणी

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार लाभार्थ्यांना गॅस जोडणी दिली आहे. आता १८ डिसेंबरपासून दुसरा टप्पा सुरू झाला असून, मार्चपर्यंत उर्वरित ३० हजार जणांना गॅस जोडणी देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलियमचे वरिष्ठ अधिकारी अलोक कुमार यांनी  पत्रकार परिषदेत दिली.अलोक कुमार म्हणाले, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मार्चपर्यंत ‘बीपीएल’ कुटुंबांच्या महिला सदस्यांना पाच कोटी गॅस जोडणी कनेक्शन आणि मार्च २०२० पर्यंत अतिरिक्त तीन कोटी गॅस जोडणी करण्यासाठी १२,८०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. ही योजना केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केली आहे. आज या योजनेने पाच कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

या योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात येणार असून नवीन ७ वर्ग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, अंत्योदय अन्न योजना, वनवासी, सर्वाधिक मागासवर्गीय, टीए आणि एक्स बेट गार्डन जमाती, बेटे तसेच नदीबेटांवर राहणारे लोक यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. तसेच पिवळे रेशनकार्ड धारक व गरीब कुटुंबातील लोकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील कॅबिनेट समितीने गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्याचा नवीन निर्णय दिला आहे. ज्या गरीब कुटुंबांना गॅस, स्टोव्ह खरेदी करण्यासाठी प्रथम आगाऊ पैसे भरता येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध केली आहे. यावेळी थोरात गॅस एजन्सीचे व्यवस्थापक सागर पाटील उपस्थित होते.

जिल्ह्यात १ लाख ४५ हजार गॅस जोडण्याजिल्ह्यात या योजनेंतर्गत ९१ टक्के लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेंतर्गत ‘एचपीसी’ने ८० हजार, ‘बीपीसी’चे ३५ हजार, ‘आयओसी’चे ३० हजार २०० असे मिळून १ लाख ४५ हजार २०० लाभार्थ्यांना गॅस जोडण्या दिल्या आहेत. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर