शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागामध्ये यंदा उसाचे गाळप ५३ लाख टनाने घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:51 IST

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुरामुळे नदी व ओढ्याकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या पुरात आठ-दहा दिवस, तर दुसऱ्यांदा आलेल्या पुरात पाच-सहा दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने तो कुजला आहे.

ठळक मुद्दे कारखान्यांचा ठोकताळा : महापुराचा फटका; तीन महिनेच हंगाम!

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : महापुराने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याने यंदा कोल्हापूर विभागात कसाबसा १ कोटी ७२ लाख टन ऊसच साखर कारखान्यांकडे गाळपासाठी येईल. गतवर्षीपेक्षा तब्बल ५३ लाख टन उसाच्या उत्पादनात घट होणार असल्याने हंगाम जेमतेम तीन महिनेच चालण्याचा ठोकताळा कारखान्यांचा आहे. सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्यात बसणार आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुरामुळे नदी व ओढ्याकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या पुरात आठ-दहा दिवस, तर दुसऱ्यांदा आलेल्या पुरात पाच-सहा दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने तो कुजला आहे. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक काळ पुराचे पाणी राहिल्याने तिथे मोठे नुकसान झाले आहे. तीच परिस्थिती सांगली जिल्ह्यातही पुराच्या पाण्याने झाली. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात ६१ हजार ९९९ हेक्टरवरील ऊस पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले.

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने घेतलेल्या आढाव्यात आगामी हंगामातील उसाच्या उत्पादनाचा अंदाज आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १०५ लाख, तर सांगली जिल्ह्यात ६७ लाख टन उसाचे गाळप होईल.गेल्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात १३५ लाख टन, तर सांगलीत ९० लाख टन उसाचे गाळप झाले होते. या तुलनेत यंदा कोल्हापुरात ३० लाख, तर सांगलीत २३ लाख टनाने उसाच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाज साखर विभागाचा आहे.१५ नोव्हेंबरनंतरच हंगामाला प्रारंभ!उसाची कमतरता आणि साखर उतारा पाहता, १ डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याच्या हालचाली सरकारच्या पातळीवर आहेत; पण पुणे विभागात उसाचे उत्पादन चांगले होईल, असा अंदाज असल्याने १ नोव्हेंबरपासूनच हंगामाला परवानगी द्यावी, अशी तेथील कारखानदारांची मागणी आहे, तर कोल्हापूर विभागात तीन महिनेच हंगाम चालेल एवढाच ऊस आहे. फेबु्रवारी फार तर मार्चच्या दुसºया आठवड्यात हंगाम संपणार असल्याने उताºयासाठी हंगाम उशिरा सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरनंतरच धुराडी पेटणार हे निश्चित आहे.

उघडीप नसल्याने वाढ खुंटलीसाधारणत: आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात उसाची वाढ जोमात होते. २००५ मध्येही महापुरात ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले होते; पण पूर ओसरल्यानंतर ऊन पडल्याने पुरात सापडलेल्या उसासह उर्वरित उसाची वाढ होण्यास मदत झाली होती. पण यावेळेला आॅगस्टसह सप्टेंबरच्या निम्म्यापर्यंत वाढीस पोषक वातावरणच न राहिल्याने उसाची वाढ खुंटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

महापुरामुळे उसाचे नुकसान झाले आहेच, त्याचबरोबर अपेक्षित वाढ नसल्याने उत्पादन घटणार आहे. आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये उसाची जोमाने वाढ होते, पण या काळातच पावसाने झोडपून काढल्याने वाढ खुंटली आहे.- विजय औताडे,साखर उद्योगातील तज्ज्ञ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर