शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बोलघेवड्या सरकारवर ‘हल्लाबोल’साठी सज्ज रहा, हसन मुश्रीफ यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 19:01 IST

सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनाची सुरुवात होणार असून, बोलघेवड्या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

ठळक मुद्देबोलघेवड्या सरकारवर ‘हल्लाबोल’साठी सज्ज रहाप्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कोल्हापूर : केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकार नुसते बोलघेवडे असून, सामान्य माणसांच्या मनात कमालीचा संताप आहे. सामान्य माणसांच्या भावना घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेस संपूर्ण राज्यात हल्लाबोल आंदोलन करीत आहे.

सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनाची सुरुवात होणार असून, बोलघेवड्या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात सोमवारी कोल्हापुरातून होत आहे. त्याच्या तयारीसाठी कोल्हापूर शहर, करवीर, दक्षिण, पन्हाळा, शाहूवाडी व हातकणंगले तालुक्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी आयोजित केली होती. त्यामध्ये ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, हल्लाबोल मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने बाहेर पडायचे आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता दसरा चौकात सभा होणार असून, कार्यकर्त्यांनी तिथे वाजत गाजत यायचे आहे.

जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, बाबूराव हजारे, शिवाजी देसाई, प्रकाश पाटील, आप्पासाहेब धनवडे, आदी उपस्थित होते.

यांच्या तोफा धडधडणार-विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, चित्रा वाघ, जितेंद्र आव्हाड.

हल्लाबोल सभा अशा होणार-सोमवारी सकाळी साडेआठ वाजता अंबाबाई दर्शन, दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार, साडेदहा वाजता मुरगूड येथे सभा, दुपारी तीन वाजता गारगोटी येथे सभा, तेथून सायंकाळी सहा वाजता दसरा चौकात सभा होणार आहे. मंगळवारी (दि. ३) सकाळी दहा वाजता नेसरी (गडहिंग्लज) येथे सभा, ४.३० वाजता पत्रकार परिषद, सायंकाळी सहा वाजता जयसिंगपूर येथे सभा होणार आहे. 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस