शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  रविकिरण इंगवले शिवसेनेत: ताराराणी आघाडीला सोडचिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 16:03 IST

कोल्हापूर महापालिकेचे माजी उपमहापौर रविकिरण विष्णूपंत इंगवले यांनी शुक्रवारी शिवसेना भवन मुंबई येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी ताराराणी आघाडीला सोडचिठ्ठी देऊन घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देरविकिरण इंगवले शिवसेनेत: ताराराणी आघाडीला सोडचिठ्ठीशिवसेना भवन येथे उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश

कोल्हापूर : महापालिकेचे माजी उपमहापौर रविकिरण विष्णूपंत इंगवले यांनी शुक्रवारी शिवसेना भवन मुंबई येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी ताराराणी आघाडीला सोडचिठ्ठी देऊन घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर देत इंगवले यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते. क्षीरसागर यांच्या माध्यमातूनच हा प्रवेश झाला आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांनी आपली बाजू भक्कम व सुरक्षित करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आहे.इंगवले हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक असूनही गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी थेट शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना पाठींबा दिला होता. त्यानंतर त्यांची वाटचाल क्षीरसागरांसोबतच राहीली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी तेजस्विनी इंगवले या ताराराणी आघाडीच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. त्यातच इंगवले यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय धुरिणांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हा ताराराणी आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. इंगवले हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णूपंत इंगवले यांचे चिरंजीव आहेत. तसेच त्यांनी यापूर्वी स्थायी समिती सभापती व उपमहापौरपदही भूषविले आहे.

शहरप्रमुखपदाची चर्चाशिवसेना प्रवेशानंतर रविकिरण इंगवले यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इंगवले यांच्या मागे असलेले तरुण कार्यकर्त्यांचे जाळे पाहता त्यांना संघटनेतील मोठी जबाबदारी मिळू शकते. त्यामुळे त्यांच्या शहरप्रमुखपदाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

  

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरे