शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : गगनबावड्यात जोरदार पाऊस, उर्वरित जिल्ह्यात मात्र उघडझाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:33 IST

गगनबावडा तालुक्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. उर्वरित जिल्ह्यात मात्र उघडझाप राहिली असून, अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या.

ठळक मुद्देगगनबावड्यात जोरदार पाऊसउर्वरित जिल्ह्यात मात्र उघडझाप

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. उर्वरित जिल्ह्यात मात्र उघडझाप राहिली असून, अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या.यंदा मान्सूनने वेळेवर हजेरी लावली असली तरी जोर दिसत नाही. ‘मृग’ नक्षत्र सुरू झाल्यानंतर दोन दिवस चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने थोडे दिवस दडी मारली. मृगाच्या पावसाने खरीप पिकांची उगवण चांगली झाली; पण मध्यंतरी पावसाने थोडी ओढ दिल्याने डोंगरमाथ्यावरील पिकांच्या वाढीवर थोडा परिणाम झाला.

दोन-तीन दिवसांनी पावसाचे पुनरागमन झाले आहे. गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी, राधानगरी तालुक्यांत चांगला पाऊस आहे; पण उर्वरित तालुक्यांत उघडझाप सुरू आहे.

कोल्हापूर शहरात अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. सकाळपासून भुरभुर राहिली. त्यानंतर ऊन पडले आणि दुपारी दोन वाजता आकाश काळवंडून येऊन जोरदार सरी कोसळल्या.मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ८.४२ मिलिमीटर पाऊस झाला. यामध्ये ४१.०० मिलिमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला.तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये हातकणंगले - ५.३३, शिरोळ - निरंक, पन्हाळा - ३.५७, शाहूवाडी - ८.१७, राधानगरी - ५.५०, गगनबावडा - ४१.००, करवीर - ६.००, कागल - १.४३, गडहिंग्लज - १.५७, भुदरगड - ९.६०, आजरा - ४.२५, चंदगड - १४.६६.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Rainपाऊसkolhapurकोल्हापूर