शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

Kolhapur Rain: तुळशी नदीच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस; राज्यातील आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 18:58 IST

Rain in Kolhapur: २४तासात या पाणलोट क्षेत्रात ८९५ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. माळवाडी केळोशी दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन डोंगराचा बहुतांशी भाग रस्त्यावर आल्याने रस्ताच गायब झाला आहे .

- श्रीकांत ऱ्हायकर लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : गेल्या आठवड्यापासून राज्यातील काही मोजकेच जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. येथील तुळशी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गुरुवारी राज्यातील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे . २४तासात या पाणलोट क्षेत्रात ८९५ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे . राज्यातील बहुदा हा सर्वाधिक पाऊस असल्याचे सांगितले जाते . महाबळेश्वर येथील जोर येथे याअगोदर ६६० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला होता . तो राज्यातील आज अखेरचा सर्वाधिक पाऊस होता . (Record break rain fall in Dhamod reagion of Radhanagari.)

     धामोड ( ता. राधानगरी ) येथील तुळशी नदीच्या चांगले पाणलोटक्षेत्र मध्ये २४तासात नोंदवल्या गेलेल्या ८९५ मिलिमीटर पावसाने इथले जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे . या पावसाने माळवाडी,पिलावरेवाडी, गोतेवाडी, कुपलेवाडी, शिरगांव या ठिकाणी दरड कोसळून व भूस्खलन होऊन मोठे नुकसान झाले आहे . काही ठिकाणी जीवित हानी सुद्धा झाली आहे . या पावसाचा अधिक फटका हा नदी-नाले,ओढ्याशेजारी असणाऱ्या शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे . नदी काठाची शेती पाण्याच्या प्रवाहाने अक्षरशः धुवून नेली आहे . नदीकाठावर चे विद्युत पंप विहिरी गायब झाल्या आहेत .

     माळवाडी केळोशी दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन डोंगराचा बहुतांशी भाग रस्त्यावर आल्याने रस्ताच गायब झाला आहे . येथील नंदकुमार नाईक या तरुणाची अर्धा एकर शेती ऊस व भात पिकासह पाण्याने पूर्णतः धुवुन नेली आहे . परिसरात झालेला हा पाऊस म्हणजे आम्ही या आधी कधीही न पाहिलेला पाऊस असल्याचे येथील वयोवृद्ध मंडळींनी सांगितले . या अगोदर सन २०१९रोजी या परिसरात ३३५ मिलिमीटर इतका पाऊस नोंदला गेला होता . पण गुरुवारी बारा तासात ४०० मिलिमीटर तर गुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळी ६पर्यंतच्या बारा तासात ४९५ मिलिमीटर असा एकूण ८९५ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे .

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस