शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

कोल्हापूर रेल्वे स्टेशन ‘मॉडेल’म्हणून होणार विकसित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 11:38 IST

कोल्हापूर रेल्वे स्टेशन मॉडेल स्टेशन म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. पुणे येथे शुक्रवारी विभागीय रेल्वे मंडळातील खासदारांची बैठक झाली. त्यामध्ये महाडिक यांनी ही मागणी केली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर रेल्वे स्टेशन ‘मॉडेल’म्हणून होणार विकसितधनंजय महाडिक यांची माहिती, पुण्यात झाली बैठक

कोल्हापूर : कोल्हापूररेल्वे स्टेशन मॉडेल स्टेशन म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. पुणे येथे शुक्रवारी विभागीय रेल्वे मंडळातील खासदारांची बैठक झाली. त्यामध्ये महाडिक यांनी ही मागणी केली आहे.मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी या बैठकीमध्ये पाच जिल्ह्यातील रेल्वेविषयक कामकाजाचा आढवा घेतला. या बैठकीला महाडिक यांच्यासह संजयकाका पाटील, खासदार उदयनराजे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते.या बैठकीत खासदार महाडिक यांनी प्रस्तावित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या सध्याच्या स्थितीबाबत विचारणा केली. या मार्गाचे काम आय. पी. आर. सी. एल. या कंपनीच्या माध्यमातून होणार असून, सध्या या मार्गाचा अभ्यास सुरू असल्याचे डी. के. शर्मा यांनी सांगितले.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर कोल्हापूर स्थानकाचा विकास व्हावा, अशी अपेक्षा महाडिक यांनी व्यक्तकेली.राजारामपुरीच्या बाजूला तिकीट बुकिंग व्यवस्था, स्वयंचलित जिना, स्थानकावरील प्रतीक्षा कक्षाचे काम नोव्हेंबर अखेर पूर्ण होणार असून प्लॅटफॉर्मवर शेड मारणे आणि अन्य कामं कोल्हापूर स्टेशनवर सुरू असल्याचे सांगण्यात आले.

गुडस् यार्डमध्ये येणारा माल उतरवण्यासाठी खूप वेळ जातो. परिणामी कोल्हापुरातून साखर पाठवताना विलंब होतो. साखर हा नाशवंत माल असल्याने तो लवकरात लवकर रवाना करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ३-४ वर शेड उभी करावी, प्रत्येक स्थानकावर वैद्यकीय व्यवस्था ठेवावी, अशा सूचना महाडिक यांनी केल्या.

कोल्हापूर- मिरज मार्गावरील विद्युतीकरणाचं काम नोव्हेंबर २०२२ अखेर, तर दुहेरीकरणाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. 

 

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूर