शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

कोल्हापूृर :  ‘रंकाळ्या’ची कोनशिला केली कचरामुक्त, १३५ वर्षाचा इतिहास पुन्हा जागृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:02 IST

कोल्हापूरी साज समजल्या जाणाऱ्या रंकाळा तलावाच्या इतिहासाची साक्ष देणारी कोनशिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये लप्त झाली होती. आमचा रंकाळा असे असे छाती फुगवून दिमाखात सांगणााऱ्यांचाही या कोनशिलेकडे दुर्लक्ष होते.

ठळक मुद्दे‘रंकाळ्या’ची कोनशिला केली कचरामुक्त, १३५ वर्षाचा इतिहास पुन्हा जागृत रंकाळा प्रेमींनी केली कोनशिलेची रंगरंगोटी

कोल्हापूृर : कोल्हापूरी साज समजल्या जाणाऱ्या रंकाळा तलावाच्या इतिहासाची साक्ष देणारी कोनशिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये लप्त झाली होती. आमचा रंकाळा असे असे छाती फुगवून दिमाखात सांगणााऱ्यांचाही या कोनशिलेकडे दुर्लक्ष होते.अखेर या १८७७ मध्ये रंकाळा तलावाचे बांधकाम करताना बसविलेल्या कोनशिलेवर रंकाळा संरक्षण व संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांची नजर पडली, अन् या समितीच्या कार्यकर्त्यानी ही राजघाट येथील कोनशिला कचरामुक्त केली. रंकाळा प्रेमींनी तिची रंगरंगोटी करुन तिचे श्रीफळ वाढवून पुजन केले, अन् १३५ वर्षापूर्वीचा इतिहास पुन्हा जागृत केला.छत्रपती शिवाजी चौथे हे अल्पवयीन असताना १८७७ मध्ये रंकाळा तलावाच्या बांधकामास सुरुवात झाली. जयसिंगराव कागलकर हे संस्थानंचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली १८८३ ला तलावाचे बांधकाम पूर्ण झाले. त्यावेळी दोन लाख ५२ हजार रुपये खर्च झाला.रंकाळावर एकून पाच घाट आहेत. त्यातील रंकाळा टॉवर शेजारील राजघाटाजवळ एका बाजूला इंग्रजीत व दुसऱ्या बाजूला मराठीत या कोनशिला बसविली आहे. राजघाटाजवळ रंकाळयातील सर्व केरकचरा काढून कोनाशिलेंजवळच टाकला जात होता. त्यामुळे ती कोनशिला कचऱ्यातच ढिगात झाकून गेली होती.रंकाळा संरक्षण व संवर्धन समितीचे विकास जाधव व अभिजीत चौगले यांनी पुढाकार घेऊन कोनशिला कचरा मुक्त करून रंगवली. विजय सावंत व श्रीकांत थोरात यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी रंकाळा समितीचे अ‍ॅड.अजित चव्हाण, दिग्दर्शक यशवंत भालकर, राजेंद्र पाटील, संजय मांगलेकर, प्रा.एस.पी. चौगले, यशवंत पाटील, शाहीर दिलीप सावंत, सुभाष हराळे, श्रीकांत जोशी, राजशेखर तंबाके, केदार यादव, सचिन जाधव, प्रशांत गडकरी, नितीन गुंजूटे, पद्माकर रेळेकर, सुधीर हराळे, किसन चव्हाण, कल्पना कुलकर्णी, निलिमा हिरेमठ,जयश्री होतकुंडे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर