शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील सोन्याच्या खाणीसाठी कोल्हापूरकरांचा ऐेंशीपासून पाठपुरावा

By संदीप आडनाईक | Updated: December 3, 2022 12:10 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूगर्भातही सोने असल्याची शक्यता पाहून राज्याच्या खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली आहे.

संदीप आडनाईककोल्हापूर : महाराष्ट्रात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोन्याच्या खाणी असल्याचा ठाम दावा १९८० पासून सातत्याने कोल्हापूर खनिकर्म विभागाचे अधिकारी रामसिंग हजारे आणि ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी हे करत आहेत. त्यांना विज्ञान प्रबोधिनी, शासकीय कर्मचारी संघटना, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोशिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव देसाई यांची साथ मिळाली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू असताना डॉ. एम.जी. ताकवले यांनी स्वतः नमुने घेऊन खातरजमा केली होती आणि आपला अहवाल तत्कालीन प्रभारी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि केंद्रीय खाणकाममंत्री श्रीपाद नाईक यांना सादर केला होता. त्याच्या मूळ प्रती अद्यापही उदय कुलकर्णी यांच्याकडे आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूगर्भातही सोने असल्याची शक्यता पाहून राज्याच्या खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली आहे. शिवाय दोन ठिकाणी सोन्याच्या खाणी असल्याचेही विभागाने जाहीर केले आहे; परंतु १९८० मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळणे आणि रेडीज येथील खाणीत सोन्याचे धातू आढळल्याचा अहवाल देण्यात आला होता. यासोबतच बेगमपूर आणि मंगळवेढ्याच्या नदीपात्रातही मौल्यवान धातूचे अंश आढळले होते. मात्र, आर्थिक कारणांमुळे यावर पुढची कार्यवाही झालेली नाही. बेगमपूर येथील वाळू आणि वडाची चार पोती पाने जाळल्यानंतर ०.६ मिलिग्रॅम सोने आढळले होते. यासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव देसाई, कुलगुरू डॉ. एम.जी. ताकवले यांच्यामार्फत खनिकर्मचे रामसिंग हजारे आणि उदय कुलकर्णी यांच्याकडील अहवाल तपासले आणि यात अशास्त्रीय काही नसल्याचे स्पष्ट केले आणि छायाचित्रकार अनिल वेल्हाळ यांनी रसायनशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक यांच्या पथकाने विद्यापीठामार्फत चाचण्या केल्या. स्वत: ताकवले यांनी हजारे यांच्या पद्धतीनुसार चाचण्या घेतल्या आणि नमुने घेतले. हा अहवाल तत्कालीन राज्यपाल, राष्ट्रपतींसोबतच तत्कालीन प्रभारी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि केंद्रीय खाणकाममंत्री श्रीपाद नाईक यांना सादर केला होता.

मान्यवरांची साथया प्रवासात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालीन केंद्रीय मंत्री मधू दंडवते, राज्यातील नेते दिग्विजय खानविलकर, गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. द.ना. धनागरेे, शासकीय कर्मचारी संघटनेचे मारुतराव वायंगणकर, गोखले महाविद्यालयातील भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. प्रभू आदींची साथ मिळाली होती. इंदिरा गांधी यांच्याकडील पत्रव्यवहारामुळे काही काळ लोहखनिजाची निर्यातही बंद झाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGoldसोनंsindhudurgसिंधुदुर्ग