कोल्हापूर, पुणे आघाडीवर
By Admin | Updated: November 28, 2015 00:19 IST2015-11-27T23:27:23+5:302015-11-28T00:19:03+5:30
राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धा : मुंबई, नाशिक, लातूर उपांत्यपूर्व फेरीत

कोल्हापूर, पुणे आघाडीवर
वाळवा : क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी क्रीडानगरी वाळवा येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत तिसऱ्या दिवशी १४ वर्षे मुले गटात कोल्हापूर, पुणे, लातूर, नाशिक विभाग संघ, तर मुलींच्या गटात कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक विभाग, १७ वर्षे मुले गटात कोल्हापूर, पुणे, लातूर, मुंबई, तर मुलींच्या गटात कोल्हापूर, मुंबर्ई, पुणे, लातूर, १९ वर्षे मुले गटात मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, तर मुलींच्या गटात मुंबई, लातूर, कोल्हापर, पुणे विभाग संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.कोल्हापूर व पुणे विभागाच्या संघांनी १४, १७, १९ वर्षे गटांतील मुले व मुलींच्या संघात सर्वच गटांत आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ मुंबई व लातूरच्या संघांनी आघाडी राखली आहे. कोल्हापूरने ‘खो-खो’तील वर्चस्व प्रारंंभीच्या सामन्यापासून उपांत्यपूर्व फेरीत सर्वच गटांत अबाधित ठेवले आहे.१४ वर्षे मुले गटात, अमरावती विरुद्ध पुणे सामन्यात अमरावतीस ६ गुण, तर पुणेस ११ गुण मिळाले आणि पुणे संघाने एक डाव पाच गुणांनी अमरावतीवर मात केली.
मुंबई विरुद्ध लातूर सामन्यात लातूर संघाने एक डाव दोन गुणांनी मुंबईवर मात केली व विजय मिळविला. कोल्हापूर विरुद्ध औरंगाबाद सामन्यात, कोल्हापूर विभाग संघाने एक डाव सात गुणांनी दणदणीत विजय प्राप्त केला व उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. १४ वर्षे मुली गटात औरंगाबाद विरुद्ध पुणे सामन्यात पुणे संघ एक डाव सहा गुणांनी विजयी झाला. नाशिक विरुद्ध लातूर सामन्यात नाशिक एक डाव एक गुणाने विजयी; तर कोल्हापूर विरुद्ध नागपूर लढतीत कोल्हापूरने एक डाव ११ गुणांनी नागपूरवर दणदणीत विजय मिळविला आणि उपात्यंपूर्व फेरीत प्रवेश केला. १७ वर्षे मुले गटात, लातूर विरुद्ध औरंगाबाद विभाग सामन्यात लातूर संघ आठ गुणांनी विजयी झाला. पुणे विरुद्ध नाशिक संघ सामन्यात पुणे संघ तीन गुणांनी विजयी झाला. अमरावती विरुद्ध मुंबई सामन्यात मुंबईने एक डाव आणि दहा गुणांनी अमरावतीवर दणदणीत विजय मिळविला. कोल्हापूर विरुद्ध नागपूर सामन्यात कोल्हापूर विभाग संघाने एक डाव १४ गुणांनी दणदणीत विजय मिळविला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.
१७ वर्षे मुली गटात नागपूर विरुद्ध पुणे यांच्या सामन्यात पुणे संघाने एक डाव आठ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. नाशिक विरुद्ध मुंबई संघातील अटीतटीच्या सामन्यात मुंबईने दोन गुणांनी विजय मिळविला. अमरावती विरुद्ध लातूर यांच्या प्रेक्षणीय सामन्यात लातूर संघ एक गुणाने विजयी झाला. कोल्हापूर विरुद्ध औरंगाबाद सामन्यात कोल्हापूर संघ एक डाव आठ गुणांनी विजयी झाला व उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
१९ वर्षे मुले गटात पुणे विरुद्ध नागपूर विभाग संघातील सामन्यात पुणे संघ एक डाव चार गुणांनी विजयी झाला. औरंगाबाद विरुद्ध नाशिक यांच्या सामन्यात नाशिकने एक डाव तीन गुणांनी विजय मिळविला. मुंबई विरुद्ध लातूर संघातील सामन्यात मुंबईच्या संघाने एक डाव तीन गुणांनी विजय मिळविला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
१९ वर्षे मुलींच्या गटात लातूर विरुद्ध नाशिक संघात झालेल्या सामन्यात अटीतटीने लातूरचा संघ दोन गुणांनी विजयी झाला. पुणे विरुद्ध अमरावतीच्या सामन्यात पुणे संघ विजयी झाला. औरंगाबाद विरुद्ध मुंबई संघातील सामन्यात मुंबईच्या संघाने एक डाव आणि नऊ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. नागपूर विरुद्ध कोल्हापूर विभाग संघातील सामन्यात कोल्हापूरने नागपूरवर एक डाव आणि ११ गुणांनी दणदणीत विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.