शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

कोल्हापूर : शेतीपंपांना मोफत नको माफक वीज द्या, तेलंगणाच्या निर्णयावर शेतकऱ्यांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 6:01 PM

तेलंगणा राज्य शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा करणारे पंजाब, कर्नाटकनंतरचे राज्य सरकार ठरले आहे. महाराष्ट्रातील पिकाखालील क्षेत्र, उपलब्ध सिंचन व्यवस्था पाहता मोफत वीज देणे सरकारला परवडणारे नाही, याची जाणीव येथील शेतकऱ्यांनाही आहे. त्यामुळे शेतीपंपांना मोफत नको पण माफक दरात वीज द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

ठळक मुद्देसन २००४ ला अकरा महिन्यांतच घेतला निर्णय मागेशेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेशनसह सर्वच संघटनांची मागणी शेती उत्पादनांना मिळणाऱ्या अनिश्चित दरामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत

कोल्हापूर : तेलंगणा राज्य शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा करणारे पंजाब, कर्नाटकनंतरचे राज्य सरकार ठरले आहे. महाराष्ट्रातील पिकाखालील क्षेत्र, उपलब्ध सिंचन व्यवस्था पाहता मोफत वीज देणे सरकारला परवडणारे नाही, याची जाणीव येथील शेतकऱ्यांनाही आहे. त्यामुळे शेतीपंपांना मोफत नको पण माफक दरात वीज द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.शेती उत्पादनांना मिळणाऱ्या अनिश्चित दरामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आला आहे. एका हंगामात दर चांगला मिळाले की दुसऱ्या हंगामात हा भाव राहील याची खात्री नसते. त्यामुळे बहुतांशी वेळा शेती उत्पादनासाठी गुंतविलेले पैसेही विक्रीतून पदरात पडत नाही.

ज्यावेळी उत्पादनखर्च कमी येईल, त्यावेळीच शेती किफायतशीर ठरू शकते. खते, पाणी व विजेचे दर माफक राहिले तरच किफायतशीर शेती ठरू शकते. शेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेशनसह सर्वच संघटनांची ही मागणी आहे.निवडणुकीच्या तोंडावर सन २००४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर कसाबसा अकरा महिने राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा केला आणि त्यानंतर बंद केला. तेलंगणा राज्य सरकारने नववर्षाला शेतीपंपांना मोफत वीज देण्याची घोषणा केल्याने येथेही मोफत विजेची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात सुमारे ४१ लाख शेतीपंप कार्यान्वित आहेत. साधारणत: राज्याच्या एकूण वीजपुरवठ्यापैकी शेतीपंपांना सरासरी १६ टक्के म्हणजे १७ हजार दशलक्ष युनिट प्रति महिन्याला वीज लागते. कर्नाटकात २० एच.पी.पर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीजपुरवठा केला जातो. महाराष्ट्रातील सिंचनाची व्यवस्था बऱ्यापैकी असल्याने मोफत वीज देणे सरकारला अडचणीचे ठरणार आहे. शेतकऱ्यांनाही मोफत वीज नको आहे, केवळ माफक दरात व पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करावा, ही मागणी आहे.

या आहेत मागण्या 

  1. माफक दरात वीज द्या.
  2. वीज वितरण कंपनीच्या मनमानीला चाप लावा.
  3. दिवसाला दहा तास तोही दिवसा वीजपुरवठा करा.

 

आमच्या शेतकऱ्यांना फुकट वीज नको, पण त्याने वापरलेल्या युनिटप्रमाणे खरी बिले द्यावीत. ‘महावितरण’च्या मनमानीमुळे त्यांना वाटेल तशी आकारणी सुरू आहे.- प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ

 

उत्पादनखर्च कमी होण्यासाठी विजेचे दर कमी झालेच पाहिजेत. आम्हाला मोफत नको पण वीजपुरवठ्यातील अनियमितता संपली पाहिजे.- संपतराव पवार,सहसचिव, शेकाप 

 

टॅग्स :agricultureशेतीkolhapurकोल्हापूर