कोल्हापूर ‘स्मार्ट सिटी’चा प्रस्ताव तयार
By Admin | Updated: July 11, 2015 00:09 IST2015-07-11T00:09:24+5:302015-07-11T00:09:24+5:30
महापालिकेची माहिती : राज्य शासनाच्या सूचनेनुसार होणार सादर

कोल्हापूर ‘स्मार्ट सिटी’चा प्रस्ताव तयार
कोल्हापूर : ‘स्मार्ट सिटी’ योजनेत १५ निकषांद्वारे गुणपद्धतीने वर्गीकरण करून शहरांची निवड होणार आहे. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या गुणपत्रिकेनुसार ‘स्मार्ट सिटी’चा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. राज्य शासनाच्या सूचनेनंतर प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शुक्रवारी दिली.महापालिकेने पाठविलेल्या निकषांची राज्य शासन त्रयस्थपणे पडताळणी करणार आहे. निकषांची पडताळणी व प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्या-त्या शहरांना त्या निकषांवर वस्तुस्थिती पाहून गुण दिले जाणार आहेत.
मनपाची स्मार्टसिटीची तयारी आॅनलाईन तक्रार निवारण
एक आठवड्यात महापालिका आॅनलाईन तक्र ार निवारण सुविधा सुरू केली जाणार आहे.
शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थामहापालिका के.एम.टी.द्वारे सक्षम व्यवस्था पुरविते. पार्किंग व्यवस्थेसाठी लवकरच बहुमजली पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे.ई-गव्हर्नन्स व लोकसहभागमहापालिका संकेतस्थळावरून माहिती प्रसिद्ध करत असते. ‘वेध-कोल्हापूर’ या ई-पत्रिकेद्वारे नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे.
गरिबांना परवडणारी घरेअकरा इमारतींसाठी असलेल्या निकषांत बसणाऱ्या झोपडपट्टीच्या ठिकाणी बहुमजली इमारती उभारण्याचे नियोजन महापालिका करणार आहे.
पाणीपुरवठाबहुतांश भागांत मुबलक पाणीपुरवठा होत नसला तरी इतर शहरांच्या मानाने स्थिती चांगली आहे.
वीज व्यवस्थाशहरात महापालिकेतर्फे वीजपुरवठा होत नाही. मात्र, रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांची सद्य:स्थिती दर्शविण्यात येईल.कचरा उठावकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. नागरिंकांना कचरा उठाव व निर्गत, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण,आदींबाबतचे नियोजन कळविण्यात येणार आहे.वैयक्तिक शौचालयमहापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील एक लाख ४० हजार घरांचा सर्व्हे करण्यात आला. शहरात किमान १५ हजार घरांमध्ये वैयक्तिक शौचालय नसल्याने पुढे आले. या निकषासाठी महापालिकेला दहापैकी किमान आठ गुण मिळण्याची आशा आहे.