शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : प्रस्तावित वीज दरवाढ मागे घ्यावी, सर्वपक्षीय कृति समितीतर्फे महावितरणला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 17:46 IST

महावितरणतर्फे वीज दरवाढ करण्यात येणार आहे. या वीज दरवाढीमुळे सामान्य जनता महागाईत होरपळून जाणार आहे; त्यामुळे प्रस्तावित वीज दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्याकडे बुधवारी केली.

ठळक मुद्देप्रस्तावित वीज दरवाढ मागे घ्यावीसर्वपक्षीय कृति समितीतर्फे महावितरणला निवेदन

कोल्हापूर : महावितरणतर्फे वीज दरवाढ करण्यात येणार आहे. या वीज दरवाढीमुळे सामान्य जनता महागाईत होरपळून जाणार आहे; त्यामुळे प्रस्तावित वीज दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्याकडे बुधवारी केली.याप्रसंगी निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, महावितरणच्या ग्राहकांना नजिकच्या काळात वीज दरवाढीचा धक्का बसणार आहे. वीज दरवाढीचा प्रस्ताव महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाला सादर केला असून, त्यात घरगुती वापरासाठीच्या विजेच्या दरात ५ टक्के वाढ सूचवली आहे. महसुलातील तूट भरून काढण्यासाठी ही दरवाढ प्रस्तावित असली तरी ग्राहकांना वीज अखंडितपणे मिळत नाही. ही अन्यायकारक दरवाढ जनता कदापि सहन करणार नाही.सहनिमंत्रक बाबासो पार्टे म्हणाले, वीज दरवाढ करून वीज ग्राहकांना बिले आली तर त्या बिलाची होळी आपल्या कार्यालयासमोर करण्यात येईल. प्रस्तावित वीज दरवाढीचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा वेगवेगळ्या माध्यमातून उग्र आंदोलन छेडले जाईल. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल, असा इशारा कृती समितीच्यावतीने देण्यात आला.याप्रसंगी दिलीप पोवार, जयकुमार शिंदे, किशोर घाटगे, अशोक भंडारे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप माने, तानाजी पाटील, फिरोजखान उस्ताद, रणजित काकडे, समीर शेख, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर