शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर समाजातर्फे मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 14:32 IST

डोक्याला भंडारा, पिवळ्या टोप्या, फेटे अन् पारंपरिक वाद्ये, होळकरशाहीची वैशिष्ट्ये सांगणारे फलक अशा उत्साही वातावरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुुकीत विशेषत: महिलांची संख्या जास्त होती. यावेळी राज्यातील सरकारच्या विरोधात फलक आणण्यात आले होते.

ठळक मुद्देअहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर समाजातर्फे भव्य मिरवणूकडोक्याला भंडारा, पिवळ्या टोप्या, फेटे अन् पारंपरिक वाद्ये, मल्हार सेनेतर्फे आयोजन

कोल्हापूर : डोक्याला भंडारा, पिवळ्या टोप्या, फेटे अन् पारंपरिक वाद्ये, होळकरशाहीची वैशिष्ट्ये सांगणारे फलक अशा उत्साही वातावरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुुकीत विशेषत: महिलांची संख्या जास्त होती. यावेळी राज्यातील सरकारच्या विरोधात फलक आणण्यात आले होते.महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, मल्हार सेना व युवक संघटना, कोल्हापूर जिल्ह्यातर्फे दसरा चौकातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर शोभा बोंद्रे, पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व माजी आमदार विनय कोरे, आदींच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला शोभा बोंद्रे व विनय कोरे यांनी पुष्पहार अर्पण केला.मिरवणुकीत गगनबावडा येथील गजीनृत्य, धनगरी ढोल, बेंजो अशी पारंपरिक वाद्ये, नाचणारा घोडा आणण्यात आला होता. यावेळी समाजबांधवांनी पिवळ्या टोप्या आणि फेटे परिधान केले होते. रिक्षांवरील होळकरशाहीचे फलक, धनगरी ढोल, गजीनृत्य अशा वातावरणात बग्गीसह मिरवणुकीला सुरुवात झाली.बिंदू चौक, शिवाजी चौक, महापालिका, सीपीआर चौकमार्गे पुन्हा दसरा चौकात येऊन मिरवणुकीची सांगता झाली.

मिरवणुकीत बबन रानगे, जिल्हाध्यक्ष बाबूराव बोडके, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, संभाजीराव जगदाळे, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, साजिद खान, नगरसेवक राजसिंह शेळके, मोहन सालपे, तौफिक मुल्लाणी, किशोर घाटगे, प्रा. विश्वास देशमुख, प्रा. शहाजी कांबळे, भाऊसाहेब काळे, शहाजी सिद, बाबूराव बोडके, छगन नांगरे, बाळासाहेब दार्इंगडे, राघू हजारे यांच्यासह धनगर समाजबांधव व महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकारreservationआरक्षण