शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिंगोशी मार्केट येथील व्हिडीओ गेम पार्लरवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 17:20 IST

कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी ते रेसकोर्स नाका जाणाऱ्या मार्गावर शिंगोशी मार्केट, तस्ते गल्ली येथील बंद गाळ्यामध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर जुना राजवाडा पोलिसांनी गुरुवारी छापा टाकून पार्लरमालकासह आठजणांना अटक केली. या ठिकाणी गेम पार्लरच्या नावाखाली जुगार सुरू होता. या कारवाईनंतर शहरातील बहुतांश व्हिडीओ पार्लर बंद करण्यात आली.

ठळक मुद्देशिंगोशी मार्केट येथील व्हिडीओ गेम पार्लरवर छापाआठजणांना अटक, २९ मशीन व रोकडीसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : शहरातील मिरजकर तिकटी ते रेसकोर्स नाका जाणाऱ्या मार्गावर शिंगोशी मार्केट, तस्ते गल्ली येथील बंद गाळ्यामध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर जुना राजवाडा पोलिसांनी गुरुवारी छापा टाकून पार्लरमालकासह आठजणांना अटक केली. या ठिकाणी गेम पार्लरच्या नावाखाली जुगार सुरू होता. या कारवाईनंतर शहरातील बहुतांश व्हिडीओ पार्लर बंद करण्यात आली.संशयित मालक सौरभ उदय गायकवाड (वय १९), अक्षय सुनील सातवेकर (२२, पाचगाव, ता. करवीर), वैभव वसंत पाटील (३२), प्रशांत नागाप्पा हलगेकर (६५, दोघे, रा. मोरेवाडी, ता. करवीर), विश्वजित ज्ञानदेव सूर्यवंशी (२२), विशाल शिवाजी कुंभार (२७), सूरज दिनकर नडाळे (२०), सुमित महादेव आरडे (२३, सर्व रा. कळंबा, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून २९ मशीनसह रोकड असा सुमारे पाच लाख १० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला.मिरजकर तिकटी ते रेसकोर्स नाका जाणाऱ्या मार्गावर शिंगोशी मार्केट, तस्ते गल्ली येथील गाळ्यामध्ये सौरभ गायकवाड आणि अक्षय सातवेकर यांनी बेकायदेशीर व्हिडीओ गेम पार्लर सुरू केले होते. त्याचा परवाना घेतला नव्हता.

या ठिकाणी राजरोसपणे जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांना मिळाली.त्यांनी पंटरच्या मदतीने गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खात्री करून छापा टाकला असता जुगार सुरू असल्याचे दिसून आले.

अचानक पडलेल्या छाप्याने जुगार खेळणारे भांबावून गेले. पोलिसांनी गेम पार्लरमधील २९ मशीन, रोख रक्कम असा सुमारे पाच लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. व्हिडीओ पार्लरचे मालक, व्यवस्थापक व जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. या कारवाईने शहरातील व्हिडीओ गेम पार्लर मालकांचे धाबे दणाणले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर