शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘प्राथमिक’ शिक्षकांचे वेतन थकले, आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 13:58 IST

टप्पा आणि नियमित अनुदानावरील खासगी प्राथमिक शाळांमधील कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे शिक्षकांचे वेतन थकले आहे. त्यासाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने दिला आहे.

ठळक मुद्दे ‘प्राथमिक’ शिक्षकांचे वेतन थकले, आंदोलनाचा इशारा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघातर्फे कारवाईची मागणी

कोल्हापूर : टप्पा आणि नियमित अनुदानावरील खासगी प्राथमिक शाळांमधील कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे शिक्षकांचे वेतन थकले आहे. त्यासाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने दिला आहे.शासनाच्या वित्त विभाग आणि शिक्षण विभागाच्या आदेशानुसार टप्पा अनुदानावरील खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे थकीत वेतन दि. ३१ मार्च २०१८ अखेर अदा होणे आवश्यक होते; पण, ते आजअखेर अदा झालेले नाही. त्यात नियमित अनुदानावरील शाळांतील शिक्षकांचा समावेश आहे.

त्यातील काही शिक्षकांचे वेतन हे आठ, सहा महिने, तर काहींचे चार आणि दोन महिन्यांपासून अदा झालेले नाही. जिल्हा वेतन पथक आणि कोषागार कार्यालयातील असमन्वयामुळे संबंधित शिक्षकांचे वेतन अदा झाला नसल्याचा आरोप महासंघाचा आहे. वेतन मिळाले नसल्याने या शिक्षकांना आर्थिक कसरत करावी लागत आहे.

अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करू नयेप्राथमिक शिक्षण विभागाचे वेतन पथक आणि जिल्हा कोषागार कार्यालयातील असमन्वयामुळे या शिक्षकांचे वेतन थकले असल्याचे राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे यांनी सांगितले.

ते म्हणाले, संबंधित वेतन थकीत राहण्यामागे जे कार्यालय दोषी असेल त्या कार्यालयावर जबाबदारी निश्चित करून तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. संबंधित अधिकाऱ्यांची बदली होणार असल्याचे समजते.

त्यामुळे थकीत वेतन प्रकरणाची चौकशी होईपर्यंत या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करू नये. त्यासह थकीत वेतन लवकर अदा करणे, अशी महासंघाची मागणी आहे. या मागण्यांची पूर्तता लवकर व्हावी अन्यथा महासंघातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक