शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात खेळाडूंचा गौरव; न्यू कॉलेजचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 17:20 IST

शिवाजी विद्यापीठातील क्रीडा अधिविभागातर्फे आयोजित सन २०१६-१७ या वर्षी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळालेल्या खेळाडूंच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

ठळक मुद्दे शिवाजी विद्यापीठात खेळाडूंचा गौरव; न्यू कॉलेजचा सन्मानकरिअरच्या दृष्टीने खेळांकडे बघा : बिभीषण पाटील;

कोल्हापूर : निव्वळ आवड म्हणून नको, तर खेळाकडे करिअरच्या दृष्टीने बघा. त्या अनुषंगाने कार्यरत रहा, असे आवाहन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेते बिभीषण पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील क्रीडा अधिविभागातर्फे आयोजित सन २०१६-१७ या वर्षी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळालेल्या खेळाडूंच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेते बिभीषण पाटील म्हणाले, खेळातील अत्याधुनिक तंत्रज्ञान समजून घेऊन खेळाडूंनी कामगिरी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांनी अधिकृत संघटनेच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. शासकीय नोकरी मिळविण्यासाठी खेळाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, ज्ञानक्षेत्रासह क्रीडाक्षेत्रामध्ये विद्यापीठाची घोडदौड सुरू आहे. यश हे नेहमी प्रवाही असते. त्यामुळे याबाबत सातत्याने लक्ष केंद्रित करावे. प्रशिक्षक, शारीरिक शिक्षण संचालक यांनी कृतिशील सल्ला देऊन यशस्वी खेळाडूंची मालिका निर्माण करावी.

या कार्यक्रमात अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य व सर्वाधिक ६४० गुण संपादन केल्याबदल न्यू कॉलेजला ‘सन २०१६-१७ मधील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ म्हणून ‘क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी’ प्रमुख उपस्थितांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर गुणवंत खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि संघटकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे, अमर सासने, किरण पाटील, आदी उपस्थित होते. क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षक जे. एच. इंगळे यांनी खेळाडूंना शपथ दिली. डॉ. दीपक पाटील-डांगे यांनी सूत्रसंचालन केले. शारीरिक शिक्षण संचालक विजय रोकडे यांनी आभार मानले.

खेळाडूंना दोन लाखांची मदतआंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना विद्यापीठातर्फे दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल. विद्यापीठाच्या माध्यमातून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा विमा उतरविला जाईल, असे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, या कार्यक्रमास अनुपस्थित असलेल्या महाविद्यालयांतील शारीरिक शिक्षण संचालकांबाबत कुलगुरू डॉ. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. खेळाडू आणि क्रीडाविकासात योगदान देता येत नसेल, शारीरिक शिक्षण संचालकांनी पदावर राहण्याबाबत विचार करावा. या संचालकांच्या काही अडचणी, प्रश्न असल्यास त्यांबाबत लवकरच बैठक आयोजित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूरSportsक्रीडा